महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या लालपरीला आता इलेक्शन ड्युटी लागली. विधासभा निवडणुकीसाठी एसटी बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाला राज्यातील ९२३२ एसटी बसेस देण्यात येणार आहेत. एसटीच्या ताफ्यातील सध्या स्वमालकीच्या १३३६७ बस आहेत. निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबईसह राज्यातील ३१ विभागातून ९२३२ गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या बस १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवसांसाठी प्रासंगिक भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या साहित्यांची वाहतूक करण्यासाठी बसेस लागणार आहेत. मात्र या बसेसची मागणी दिवसातील ठरावीक कालावधीसाठी आहे, यासाठी प्रवाशी वाहतुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावा प्रशासनाने केलाय.
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने एसटीकडे दोन दिवसांसाठी ९ हजार बसची मागणी केली होती. १९ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर मतदान यंत्रे घेऊन जाण्यासाठी ८९८७ बस आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी आणण्यासाठी बस लागणार आहेत. दोन्ही दिवशी तितक्याच बसेस लागणार आहेत.
त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला २४५ बसदेखील देण्यात आल्या आहेत. दरम्यान इतक्या मोठा बसेस उपलब्ध करून देण्यात येणे हे मोठे आव्हान असेल,मात्र मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येणआर नाही. याची काळजी घेतली जाईल, असं एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील बस देण्यात आल्या होत्या. मार्ग आणि किलोमीटरप्रमाणे त्यांचे भाडे ठरवण्यात आले होते. त्यावेळी एका बससाठी २४ ते ३० हजार रुपये एसटीला उत्पन्न मिळाले होते. विधानसभा निवडणुकीतही त्याप्रमाणेच भाडेआकारणी होणार असल्याने आताही फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणुकीसाठी महामुंबईतून ८७८ एसटी बस देण्यात येतील. यात मुंबईसाठी २८०, पालघर-२५०, ठाणे-१११, रायगड-२३७ बस देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.