Hingoli News : बोटावर शाई दाखवा, दाढी कटिंग फुकट; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सलून व्यावसायिकाचा उपक्रम

Hingoli News : देशाच्या लोकशाहीचा आज उत्साह सुरू आहे. प्रामुख्याने या उत्साहात सहभागी होऊन मतदान करावे यासाठी प्रशासनासह अनेक जण या उत्सवाची जनजागृती करत आहे
Hingoli News
Hingoli NewsSaam tv

हिंगोली : लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून जनजागृती केली जाते. (Hingoli) वेगवेगळ्या पद्धतीने ही जनजागृती केली जात असून यात सलून व्यावसायिकाने देखील स्वतः पुढाकार घेतला असून मतदान देण्याची बोटावर शाई दाखविल्यास दाढी- कटिंग मोफत करून देणार आहे. (Breaking Marathi News)

Hingoli News
Jalgaon Crime : दुचाकी अडवून मारहाण करत पैसे घेऊन झाले पसार; जळगाव शहरातील घटना

देशाच्या लोकशाहीचा आज उत्साह सुरू (Lok Sabha Election) आहे. प्रामुख्याने या उत्साहात सहभागी होऊन मतदान करावे यासाठी प्रशासनासह अनेक जण या उत्सवाची जनजागृती करत आहे. प्रामुख्याने निवडणूक म्हटली कि राजकीय पक्षांकडून मत मागितले जातात. परंतु अनेक मतदार हे आपला हक्क बजावत नसल्याने प्रत्यक्षात (Voting) मतदानाची टक्केवारी कमी राहत असते. यामुळे हा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात असून हिंगोलीच्या औंढा शहरातील सलून व्यावसायिकाने देखील एक प्रयत्न केला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hingoli News
Nandurbar Lok Sabha : नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या अर्जावर भाजपचा आक्षेप; माहिती लपविल्याचा आरोप

महेश खुळखुळे या सलून व्यावसायिकाने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बोटावरील शाई दाखवा आणि दाढी कटिंग फुकट करा; असा उपक्रम राबवला आहे. खुळखुळे यांच्या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. तर अनेक जण मतदान करून या सुवर्णसंधीचा फायदा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com