Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करूनही जिल्ह्यातील काही खाजगी शाळांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची निवडणूक आयोगाकडे माहिती सादर केली नाही
Published on

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात यात नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी कोणत्याही कारणाने रद्द केली जात नाही. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून खासगी शाळेतील कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली नाही. अशा संभाजीनगर जिल्ह्यातील ३३ मुख्याध्यापकांवर आता निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करूनही जिल्ह्यातील काही खाजगी शाळांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची निवडणूक आयोगाकडे माहिती सादर केली नाही. जिल्ह्यातील ९२ शाळांनी कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला (Vidhan Sabha Election) सादर केली नव्हती. अशा ३३ खासगी अनुदानीत शाळांच्या मुख्याध्यापकांवर यापूर्वीच शिक्षण विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. आता त्या मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. 

Sambhajinagar News
Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

संभाजीनगर जिल्ह्यातील ९२ शाळांनी कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर केली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत प्राथमिक १७ आणि माध्यमिकच्या १६ अशा ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल झाले. त्याच मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 

Sambhajinagar News
Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

तर अनुदान होणार बंद 

दरम्यान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काढलेल्या आदेशानुसार संस्थाचालकांनी मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई केली नाही; तर त्या शाळेचे अनुदान बंद करण्याची शिफारस शिक्षण सचिवांकडे केली जाईल, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com