Cash For Votes in Maharashtra: महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दिग्गज नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर कारवाई मोठी करण्यात आलीय. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केलाय. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान विनोद तावडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय. त्याच्याविरोधात कट रचण्यात आला असून निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. मी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, मी काही चुकीचं केलं नाहीये. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कट रचला असल्याचा आरोप विनोद तावडेंनी आपल्या स्पष्टीकरणात केलाय. आता पोलीस आणि निवडणूक आयोगाने याचा तपास करावा असं तावडे म्हणालेत.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप होत आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय की, तावडे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आलेत. ते पैसे मतदारांना वाटण्यासाठी दिले जात होते. त्या आरोपांवर विनोद तावडे म्हणाले, मला आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, सीसीव्हीटी फुटेज काढून त्याच्यावरून तपास करण्यात यावा.
तेथील बूथ व्यवस्थापनाचे काम पाहण्यासाठी मी गेलो होतो. मतदानानंतर ईव्हीएम कशाप्रकार सील केलं जातं याची माहिती देण्यासाठी मी आलो होतो. याचदरम्यान विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटलं की, आम्ही पैसे वाटत आहोत. मी ४० वर्षापासून पक्षात आहे. जे खरं आहे आहे, ते सर्वांना माहिती आहे. परंतु निवडणूक आयोगाने आणि पोलिसांना याचा तपास केला पाहिजे. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत, त्यातून स्पष्ट होईल असं विनोद तावडे म्हणालेत.
विनोद तावडे पैसे वाटत असल्याचं समजल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर विवांता हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत क्षितिज ठाकूरही उपस्थित होते. हितेंद्र यांनी आरोप केलाय की, विनोद तावडे ५ कोटी रुपये घेऊन आले होते. त्यांच्याजवळून डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात पैसे वाटप करण्यात आल्याची नोंद करण्यात आलीय. हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा सूपूत्र हे दोघेही वसई आणि नालासोपारा येथे विद्यमान आमदार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.