Dr Hina Gavit : ऐन निवडणुकीत भाजपला मोठा झटका; ३ टर्मच्या खासदाराचा राजीनामा, आमदारकीला अपक्ष उतरणार

Dr Hina Gavit Resignation : काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तसेच आज त्यांनी थेट पक्षालाच रामराम ठोकला आहे.
Dr Hina Gavit Resignation
Dr Hina GavitSaam Tv
Published On

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या माजी खासदार डॉ.हिना गावित यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आज त्यांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी यासाठी शिंदे गटाला जबाबदार ठरवलं आहे. शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या गद्दरीमुळे मी राजीनामा दिला, असं डॉ.हिना गावित यांनी म्हटलं आहे.

Dr Hina Gavit Resignation
Bjp Candidate List: भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीतील 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष, जाणून घ्या ५ मोठ्या गोष्टी

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाच्या मुद्द्यावरून हिना गावित नाराज होत्या. भाजपकडून त्यांना या मतदारसंघात उमेदवारी हवी होती. मात्र महायुतीकडून ही जागा शिंदे सेनाला मिळाली. त्यामुळे येथे आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावर डॉ.हिना गावित यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काल अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तसेच आज त्यांनी थेट पक्षालाच रामराम ठोकला आहे.

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या केसी पाडवी यांना मिळाली आहे. तर महायुतीत आमशा पाडवी रिंगणात आहेत. त्याचबरोबर डॉ.हिना गावित या देखील या मैदानात उतरल्या आहेत.

भाजपाला रामराम ठोकण्याचं स्वत: सांगितलं कारण

गेल्या १० वर्षांपासून मी भारतीय जनता पार्टीसोबत काम केलं आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील जागा शिंदे गटाला मिळाली, आता माझ्यामुळे माझ्या पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या गद्दारीमुळे मी राजीनामा दिला आहे, असं कारण डॉ.हिना गावित यांनी स्वत: सांगितलं आहे.

Dr Hina Gavit Resignation
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस शिवदीप लांडे यांनी अचानक दिला राजीनामा; फेसबुकवर पोस्ट करत सांगितलं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com