यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघाकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याचं कारण म्हणजे 'राज' पूत्र अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सदा सरवणकर यांनी मागे न हटण्याचा निर्णय घेतल्याने येथील लढत रंजक होणार आहे. दरम्यान आज अमित ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांनी आपल्या नावावरच्या संपत्तीचं विवरण दिलंय.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. अमित ठाकरेंकडे एकूण १३.८३ कोटी रुपयांची मालमत्ता आहे तर ४.१९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्याकडे १.७२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ठेवी, शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे. अमित आणि मिताली दोघांचा व्यवसाय ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह हा आहे.
अमित ठाकरे यांच्या नावावर १२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण जंगम मालमत्ता आहे. तर १ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अमित ठाकरे यांच्यावर ४ कोटी १९ लाख रुपयांचे कर्जदेखील आहे. अमित ठाकरेंकडे आता १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम आहे. तर बँक खात्यात ४० लाख ९९ हजार ७६३ रुपये इतकी रक्कम आहे.
अमित ठाकरेंकडे ६ कोटी २९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर शेअर्स ३ कोटी ९८ लाख रुपयांचे आहेत. पोस्ट खात्यात २० लाख रुपयांची गुंतवणूक आहे. इतकी मोठी मालमत्ता असलेल्या अमित ठाकरेंकडे एकही गाडी नाहीये. त्यांच्या नावावर एकही कार नाहीये. तसेच त्यांच्या नावावर एकही गुन्हा दाखल नाहीये. अमित ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात आपला ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह असा व्यवसाय असल्याचं म्हटलंय.
अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावे १ कोटी ७२ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर ५८ लाख ३८ हजार ५८७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.त्यांच्या नावावर ५ कोटी ९३ लाख रुपयांच्या ठेवी, तर म्युचूअल फंडमध्ये ५२ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केलीय. मिताली ठाकरे यांच्याकडे ९ तोळे सोने आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर ७० हजार रुपये आहेत. तसेच मुलाच्या नावाच्या म्युच्यूअल फंडमध्ये ६० लाख रुपयांची गुंतवणूक केलीय. त्याचप्रमाणे मिताली यांची तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी आहे. सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.