Maharashtra Assembly Election : अजित पवारांची ७ जणांची दुसरी यादी, सुनील टिंगरेंना संधी, जयंत पाटलांविरोधात दिला तगडा उमेदवार!

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जारी केली आहे.
Maharashtra Election
Maharashtra Assembly Electionsaam
Published On

Ajit Pawar NCP Second List : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर झाली. सुनील टिंगरे, काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या यादीची घोषणा केली. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना घेरण्यासाठी अजित पवार यांनी मोठा डाव टाकलाय. अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपमधून आलेल्या काही उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात काका पाटील, निशिकांत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे. तर काँग्रेसमधून आलेल्या झिशान सिद्दीकी यांनाही मैदानात उतरवलेय.

बुधवारी अजित पवार यांनी ३८ जणांच्या उमेदवारीची पहिली यादी जारी केली होती. आता ७ उमेदवारांची यादी जाहीर झाली. एकूण ४५ उमेदवारांची घोषणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीत कुणाला मिळाली उमेदवारी?

वडगाव शेरी - सुनील टिंगरे

वांद्रे पूर्व - झिशान सिद्दीकी

अणूशक्तीनगर - सना मलिक

तासगाव - संजय काका पाटील

इस्लामपूर - निशिकांत पाटील

शिरुर - माऊली कटके

लोहा-कंधार - प्रताप पाटील चिखलीकर

Sanjay Kaka Patil यांचा अजित पवार गटात प्रक्षप्रवेश, मोठं इनकमिंग!| Marathi News

झिशान सिद्दीकी, सना मलिक, सांगलीचे काका पाटील, भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. काका पाटील यांना तासगावमध्ये उमेदवारी देण्यात आली. तर निशिकांत पाटील यांना जयंत पाटील यांच्याविरोधात इस्लामपूर येथून उमेदवारी दिली. झिशान सिद्दीकी यांना वांद्रे येथे वरुण सरदेसाई यांच्याविरोधात मैदानात उतरवम्यात आलेय. दरम्यान, नवाब मलिक यांचे तिकीट कापल्याचे समोर आलेय. त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली.

पहिल्या यादीत ३८ जणांना उमेदवारी -

बारामती - अजित पवार

येवला - छगन भुजबळ

आंबेगाव - दिलीप वळसे पाटील

कागल - हसन मुश्रीफ

परळी - धनंजय मुंडे

दिंडोरी - नरहरी झिरवाळ

अहेरी - धर्मरावबाबा आत्राम

श्रीवर्धन - आदिती तटकरे

अंमळनेर - अनिल पाटील

उदगीर - संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले

माजलगाव - प्रकाश दादा सोळंके

वाई - मकरंद पाटील

सिन्नर - माणिकराव कोकाटे

खेड आळंदी - दिलीप मोहिते

अहमदनगर शहर - संग्राम जगताप

इंदापूर - दत्तात्रय भरणे

अहमदपूर - बाबासाहेब पाटील

शहापूर - दौलत दरोडा

पिंपरी - अण्णा बनसोडे

कळवण - नितीन पवार

कोपरगाव - आशुतोष काळे

अकोले किरण लहामटे

वसमत - चंद्रकांत नवघरे

चिपळूण - शेखर निकम

मावळ - सुनील शेळके

जुन्नर - अतुले बेनके

मोहोळ - यशवंत विठ्ठल माने

हडपसर - चेतन तुपे

देवळाली - सरोज अहिरे

चंदगड - राजेश पाटील

इगतपुरी - हिरामण खोसकर

तुमसर - राजू कोरमेर

पुसद - इंद्रनील नाईक

अमरावती शहर - सुलभा खोडके

नवापूर - भरत गावित

पाथरी - निर्माला उत्तमराव विटेकर

मुंब्रा कळवा - नजीब मुल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com