Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधलाय. उमेदवार मिळेना म्हणून थेट महायुतीतल्या एकनाथ शिंदेंचाच उमेदवार फोडून कोल्हेंविरोधात उतरवला.
शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात
Sharad Pawar Vs Ajit PawarSaam Tv

Shirur Lok Sabha Constituency:

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधलाय. उमेदवार मिळेना म्हणून थेट महायुतीतल्या एकनाथ शिंदेंचाच उमेदवार फोडून कोल्हेंविरोधात उतरवला. म्हणूनच शरद पवारांनीही अमोल कोल्हेंसाठी पॉवरफुल प्रचार करण्याची तयारी केलीय. शरद पवार शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारासाठी 6 सभा घेणार आहेत.

शिरूरमध्ये 'पॉवरफुल' प्रचार

शिरूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची सभा होणार आहे. शिरूर, हडपसर, आंबेगाव, खेड -आळंदी आणि भोसरीमध्ये पवारांची मॅरेथॉन सभा होईल. तर एकट्या जुन्नर विधानसभेत शरद पवारांच्या दोन सभा होणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे ठाकरे आणि आदित्य ठाकरेही भोसरी विधानसभेत प्रचार रॅली काढणार आहेत.

शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात
Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

अमोल कोल्हेंसाठी पवार मैदानात!

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर कार्यकर्ते दोन गटात विभागलेत. अमोल कोल्हेंनी शरद पवारांना साथ दिल्याची सल अजित पवारांच्या मनात आहे, असं बोललं जातं. म्हणूनच अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज दिलंय. अजित पवारांच्या आव्हानानंतर शरद पवारांनीही कोल्हेंच्या पाठीमागे मोठी फळी उभी केलीय. शरद पवारांनी 6 सभाचं आयोजन करून अमोल कोल्हेंच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचे संकेत दिलेत.

शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात
PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते आता प्रचाराच्या मैदानात उतरलेत. शिरुरमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई जुंपलीय. आपल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोन्ही नेते पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत. मात्र काका पुतण्याच्या लढाईत नेमका कुणाचा उमेदवार शिरुरचं मैदान मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com