Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Praniti Shinde: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. भाजपने प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पुलवामा हल्ला केंद्र सरकारचा नियोजित कट होता, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता.
Praniti Shinde
Praniti ShindeSaam Tv

Praniti Shinde News:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. भाजपने प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पुलवामा हल्ला केंद्र सरकारचा नियोजित कट होता, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता. त्यांचं हे वक्तव्य देशाची बदनामी करणारं, असल्याचं म्हणत भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

भाजपने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे ही तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत भाजपने म्हटलं आहे की, ''सोलापूर मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार प्राणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात देशद्रोही वक्त्यवं केले आहे. सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी राजकीय फाय‌द्यासाठी या दुःखद घटनेचा गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. प्रणिती शिंदे यांनी विधान केले की, पुलवामा हल्ला हे केंद्र शासन व पंतप्रधान मोदीजींनी आपल्या जवानांचे रक्त सांडून घडलं नसून घडवले आहे.''

Praniti Shinde
PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

तक्रारीत म्हणण्यात आलं आहे की, ''काश्मीरमध्ये पुलवामा भागात पाकिस्तानी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला होता. पुलवामाचा हा हल्ला घडला नाही तर घडविण्यात आला होता. प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनीच त्याचा गौप्यस्फोट केला होता. हे वक्त्यवं देशाची बदनामी करणारे देशद्रोही वक्तव्य आहे. जे निवडणूक नियमांची तसेच आपल्या देशाच्या सैन्याचे मनोधैर्य खचवणारे आहे.''

Praniti Shinde
Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

तक्रारीत पुढे सांगण्यात आलं आहे की, ''2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, जेव्हा पाकिस्तानस्थित दहशतवाद्‌यांनी पुलवामा, काश्मीरमध्ये भीषण हल्ला केला, तेव्हा हे खेदजनक आहे की, दहशतवादाविरुद्ध एकजूट होण्याऐवजी, सोलापूर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या राजकीय अजेंडांसाठी एक साधन म्हणून त्याचा वापर करणे निवडले आहे. त्याचा राजकीय हेतूने उपयोग करून घेत आहेत. हा शहीद जवानांचा अपमान आहे. अशी विधाने केवळ आपल्या सशस्त्र दलांच्या प्रयत्नांनाच कमी करत नाहीत तर राष्ट्रीय सुरक्षेच्या संवेदनशील मुद्द्यांचे राजकारण करतात. ''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com