PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

PM Modi News: जगतभारी कोल्हापुरी, असं म्हणता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोल्हापूर येथील आपल्या सभेला सुरुवात केली.
PM Modi Speech At Kolhapur
PM Modi Speech At KolhapurSaam Tv

PM Modi Speech At Kolhapur :

जगतभारी कोल्हापुरी, असं म्हणता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोल्हापूर येथील आपल्या सभेला सुरुवात केली. सगळ्या कोल्हापूरकरांना माझा नमस्कार, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली.

यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''मी काशीचा खासदार आहे आणि करवीर काशीला आलो आहे, हे माझे सौभाग्य आहे, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. कोल्हापूरला महाराष्ट्राचे फुटबॉल हब म्हटले जाते. येथील तरुणांमध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे मी फुटबॉलच्या दृष्टीने म्हटल्यास दुसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता भाजप आणि एनडीए 2.0 आघाडीवर आहेत.''

PM Modi Speech At Kolhapur
Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

ते म्हणाले, ''काँग्रेस आणि इंडिया आघाडीने देशविरोधी आणि द्वेषपूर्ण राजकारणाचे दोन सेल्फ गोल केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निश्चित झाले आहे.''

नरेंद्र मोदी म्हणाले की, ''इंडिया आघाडीचे लोक म्हणत आहेत की, जर त्यांचे सरकार बनले तर ते सीएए कायदा रद्द करतील. तीन आकड्यांमध्ये जागा जिंकण्याची आकांक्षा असणारे इंडिया आघाडीचे हे लोक सरकारच्या दारापर्यंत पोहोचू शकतील का? आता ते एका वर्षासाठी एक पीएम असा फॉर्म्युला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे पाच वर्षांत पाच पंतप्रधान... देश हे कधीही सहन करणार नाही.''

PM Modi Speech At Kolhapur
Ujjwal Nikam: भाजपचं ठरलं, मुंबई उत्तर-मध्यमध्ये उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, वर्षा गायकवाड यांच्याशी थेट लढत

ते म्हणाले, ''अयोध्येतील राम मंदिराचे 500 वर्षे जुने स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेक दशकांपासून राम मंदिराचे बांधकाम थांबवणाऱ्या काँग्रेसनेही बहिष्कार टाकला. राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रणही काँग्रेसच्या लोकांनी नाकारले. मात्र अन्सारी आणि त्यांचे अयोध्येचे कुटुंब, जे आयुष्यभर राम मंदिराच्या विरोधात कोर्टात खटला लढत राहिले... पण जेव्हा कोर्टाने हे राम मंदिर आहे, असे सांगितले तेव्हा अन्सारी स्वतः राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी उपस्थित होते.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com