Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Priyanka Gandhi On BJP: ''देशात सगळ्यात जास्त आता बेरोजगारी आहे. 70 कोटी तरुण बेरोजगार आहेत. मागच्या दहा वर्षापासून समस्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे'', असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल
Priyanka Gandhi On BJPSaam Tv
Published On

Priyanka Gandhi On BJP:

>> संदीप भोसले

''देशात सगळ्यात जास्त आता बेरोजगारी आहे. 70 कोटी तरुण बेरोजगार आहेत. मागच्या दहा वर्षापासून समस्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे'', असं म्हणत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज लातूर येथील प्रचार सभेत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

त्या म्हणाल्या की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाबाहेर बाहेर फिरत आहेत आणि देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. मोदींपेक्षा मोठा नेता या देशात नाही, असं भाजपचं म्हणणं आहे. मात्र देशात दहा वर्षात काय केलं, हे ते सांगत नाही. देशात महिला सुरक्षित नाहीत, गरिबी वाढली आहे.''

महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल
Ujjwal Nikam: भाजपचं ठरलं, मुंबई उत्तर-मध्यमध्ये उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, वर्षा गायकवाड यांच्याशी थेट लढत

प्रियांका गांधी म्हणाल्या की, ''पाच किलो मोफत राशन घेऊन तुमच भविष्य बनणार आहे का? सोने, चांदी ,पेट्रोल-डिझेल, शिक्षण फी सर्व महाग झालं आहे.'' त्या म्हणाल्या, देशातल्या शेतकऱ्यांवर जीएसटी लावली आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या 600 शेतकरी शहीद झाले.''

त्या पुढे म्हणाल्या की, ''मोदींच्या काळात अत्याचार झालेला महिलांना न्याय दिला जात नाही. आता वेळ आली आहे, बदल घडवण्याची. लोकशाही आणि संविधान आपलं रक्षण करते. मात्र लोकशाही आणि संविधान विरोधात भाजप सरकार जात आहे.''

महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल
Maharashtra Politics: विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत

प्रियांका गांधी म्हणाल्या की, ''भाजप सरकार संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात सरकार कसे स्थापन झालं, हे सर्वांना माहिती आहे. जिथे जिथे यांचे सरकार आहे, तिथे भ्रष्टाचार पसरला आहे.'' त्या म्हणाल्या की, ''पंतप्रधान तरुणांना रोजगार देऊ शकत नाहीत. महिलांना सुरक्षितता देऊ शकत नाहीत, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ शकत नाही, मग अशा नेत्यांचा काय फायदा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com