Ujjwal Nikam: भाजपचं ठरलं, मुंबई उत्तर-मध्यमध्ये उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, वर्षा गायकवाड यांच्याशी थेट लढत

Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तर - मध्यमधून भाजपने ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यानं उमेदवारी दिली आहे. याआधी महाविकास आघाडीतून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली होती.
भाजपचं ठरलं, मुंबई उत्तर-मध्यमध्ये उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, वर्षा गायकवाड यांच्याशी थेट लढत
Ujjwal NikamSaam Tv

Lok Sabha Election 2024:

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पंधरावी यादी जाहीर केली आहे. भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

पूनम महाजनांचा पत्ता कट

याआधी भाजपच्या पूनम महाजन या येथून भाजपच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता.

भाजपचं ठरलं, मुंबई उत्तर-मध्यमध्ये उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, वर्षा गायकवाड यांच्याशी थेट लढत
Maharashtra Politics: विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत

यानंतर २०१९ मध्येही प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. यंदाही त्यांना तिकीट मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता भाजपने त्यांचा पत्ता कट करत निकम यांना तिकीट दिलं आहे.

कोण आहेत उज्ज्वल निकम?

उज्ज्वल निकम हे नामवंत वकील आहेत. उज्ज्वल निकम यांनी जळगावात वकिलीच शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्यांनी जळगाव न्यायालयातच सरकारी वकील म्हणून काम केलं. सरकारी वकील म्हणून 1993 मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे उज्वल निकम यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.13 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्ररकरणी तत्कालिन सरकारने या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.

भाजपचं ठरलं, मुंबई उत्तर-मध्यमध्ये उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, वर्षा गायकवाड यांच्याशी थेट लढत
Sharad Pawar Video : भाषण संपलं, कार्यकर्त्यांमधून आवाज आला; पाटणच्या सभेत शरद पवार यांनी उडवली कॉलर

मुंबई बॉम्बस्फोटाचा हा खटला जवळपास चौदा वर्षे म्हणजे २००७ पर्यंत चालला. १९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटला, खैरलांजी हत्याकांड, २००८ मुंबई हल्ला, शक्ती मिल बलात्कार केस, प्रवीण महाजन, कोपर्डी बलात्कार आणि हत्या, यासांरखे अनेक गाजलेले खटले त्यांनी चालवले.

देशाचे लक्ष वेधणार खटले लढविणाऱ्या निकम यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. हायप्रोफाईल खटल्यामुळे निकम यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने, सरकारने त्यांना झेड-प्लस सुरक्षा पुरवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com