Solapur Lok Sabha 2024: प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ राहुल गांधी मैदानात; सोलापुरात आज काँग्रेसची जाहीर सभा

Rahul Gandhi Sabha: काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत.
Rahul Gandhi Sabha
Rahul Gandhi SabhaSaam TV

Maharashtra Lok Sabha Election 2024

काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून अमरावती आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. अमरावती मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज ११ वाजता सभा घेतील. त्यानंतर ते सोलापुराच्या दिशेने रवाना होतील.

Rahul Gandhi Sabha
Lok Sabha Election: पुण्यात एकाच दिवशी महायुतीसह मविआची सभा, मोदींच्या सभेला ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर?

सोलापूर मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) सोलापुरातील एक्झीबिशन मैदानावर ३ वाजता सभा घेणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली आहे.

राहुल गांधी यांच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा (Lok Sabha Election 2024) प्रचार करण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी भंडा-गोंदिया मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती.

त्यानंतर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची १४ एप्रिल रोजी नागपुरमध्ये जाहीर सभा झाली होती. आता राहुल गांधी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील आज नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमरावतीत येणार आहेत.

राहुल गांधी आणि अमित शहा या दोन बड्या नेत्यांच्या आज अमरावतीत सभा होणार आहे. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांवर काय टीका करतात? कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Rahul Gandhi Sabha
Supriya Sule: आजचा काळ संघर्षाचा, इंग्रज आल्यासारखे लढाई सुरू आहे; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com