Lok Sabha Election: पुण्यात एकाच दिवशी महायुतीसह मविआची सभा, मोदींच्या सभेला ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर?

Maharashtra Politics: पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. त्याचदिवशी पुण्यातच ठाकरे आणि शरद पवारांची सभा होणार आहे. त्यामुळे मोदींच्या सभेला सभेतूनच प्रत्युत्तर देण्याची ही रणनिती आहे का, असा सवाल केला जात आहे.
पुण्यात एकाच दिवशी महायुतीसह मविआची सभा, मोदींच्या सभेला ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर?
Lok Sabha Election 2024 Saam Tv

Maharashtra Politics: 

पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. त्याचदिवशी पुण्यातच ठाकरे आणि शरद पवारांची सभा होणार आहे. त्यामुळे मोदींच्या सभेला सभेतूनच प्रत्युत्तर देण्याची ही रणनिती आहे का, असा सवाल केला जात आहे.

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. महाराष्ट्रात महायुतीसह मविआचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पुण्यात 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. मोदींच्या सभेला प्रत्युत्तर म्हणून मविआचीही त्याचदिवशी पुण्यात सभा होणार आहे. त्यामुळे पुण्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

पुण्यात एकाच दिवशी महायुतीसह मविआची सभा, मोदींच्या सभेला ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर?
Eknath Khadse: एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश का रखडला? स्थानिक राजकारणाचा अडसर, की दुसरं काही?

29 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची पुण्यातील एसपी कॉलेजवर होणारी सभा आता रेसकोर्स मैदानावर होणार आहे. त्याचदिवशी वारजेतील आरएमडी कॉलेजच्या मैदानावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. नरेंद्र मोदींच्या सभांना प्रत्युत्तर म्हणून त्याच दिवशी महाविकास आघाडीची पुण्यात सभा होत आहे का, अशी चर्चा सुरू झालीये.

मविआकडून 29 तारखेच्या सभेसाठी अर्ज दाखल करण्यात आलाय. पण पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सभा घेण्यावर ठाकरे गटासह महाविकास आघाडी ठाम आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महायुतीसह मविआची सभा एकाच दिवशी झाल्यास मोदींच्या टीकेला मविआचे नेते लगेच उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचंय.

पुण्यात एकाच दिवशी महायुतीसह मविआची सभा, मोदींच्या सभेला ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर?
South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईत शिंदे गटाचा उमेदवार ठरला, या आमदाराला मिळणार तिकीट?

पुण्यात 29 तारखेला मोदींची सभा होणार आहेत. त्याचदिवशी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा झाल्यास राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यास मविआचा प्लॅन बी काय असणार, हे पाहणंही महत्त्वाचंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com