Maharashtra Politics: महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम; नाशिकमध्ये भुजबळांच्या माघारीनंतरही पेच सुटेना

Nashik Lok Sabha Constituency: महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतल्यानंतर जागेचा पेच आणखी वाढला आहे.
Nashik Lok Sabha Constituency
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

रूपाली बडवे साम टीव्ही, मुंबई

महायुतीत जागावाटपाचा (Maharashtra Politics) तिढा कायम असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी नाशिकमधून माघार घेतल्यानंतर जागेचा पेच आणखी वाढला आहे. छगन भुजबळांच्या माघारीनंतर अद्यापही महायुतीकडून नाशिकच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नाही, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष महायुतीच्या भूमिकेकडे लागलं आहे.

नाशिकमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे, परंतु महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. नाशिकच्या जागेसाठी सेनेच्या इच्छुक (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवाराकडून प्रचार सुरू झाला आहे. नाशिकमध्ये भुजबळांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. या जागेसाठी भाजपा देखील आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.

महायुतीमध्ये नाशिकप्रमाणे ठाणे, पालघर मतदारसंघामध्ये देखील जागांचा पेच कायम आहे. अजून ठाणे, पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचीही घोषणा झालेली नाहीये. महायुतीमध्ये अद्यापही नाशिक लोकसभेच्या जागेवरुन (Mahayuti Seat Sharing) रस्सीखेच सुरूच आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू होती. परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. अजून या जागेवर उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. तर छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याचं जाहिरपणे सांगितलं (Bhujbal Withdrawn) आहे. महायुतीत नाशिकच्या जागेचा पेच कायम आहे. भुजबळांच्या माघारीला २ दिवस उलटूनही अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नाही.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha 2024: मला बिनविरोध निवडून द्या, शांतीगिरी महाराज हट्टाला पेटले; नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय?

शिंदेंच्या शिवसेनेकडून अद्यापही उमेदवारीबाबत (Lok Sabha) चाचपणी सुरूच आहे. या जागेसाठी गोडसे, बोरस्ते, करंजकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भुजबळांच्या माघारीनंतर गोडसेंचा मार्ग मोकळा झाल्याची परिस्थिती असताना शिवसेनेत अजूनही उमेदवारीबाबत खल दिसत आहे. तर भाजपचा देखील नाशिकच्या जागेसाठी आग्रह कायम आहे. जागेचा निर्णय लांबणीवर पडत असल्यानं (Maharashtra Election) इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha 2024: मला बिनविरोध निवडून द्या, शांतीगिरी महाराज हट्टाला पेटले; नाशिकमध्ये नेमकं काय घडतंय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com