Maharashtra Election 2024: अमोल मिटकरी, सुनील शेळके राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक; अजित पवार गटाकडून ३७ नेत्यांची नावे जाहीर

Ajit Pawar Group Declared 37 Star Campaigners List For Lok Sabha Election: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सुपुर्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये मित्र पक्षांना स्थान देण्यात आले नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv

Star Campaigners List By Ajit Pawar:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावरुन कलह सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सुपुर्त करण्यात आली आहे. (Maharashtra Lok Sabha Election 2024)

Ajit Pawar
Sunil Shelke News: मावळात श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार; सुनील शेळकेंकडून 'यू टर्न' घेण्याची तयारी

याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी निवडणुक आयोगाकडे देण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, यांंच्यासह ३७ नेत्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे याआधी शिवसेना शिंदे गटाने दिलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजप, राष्ट्रवादी या मित्रपक्षांची नावे होती. मात्र राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये मित्र पक्षांना स्थान देण्यात आले नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार, मावळचे आमदार सुनील शेळके, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, कृषीमंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर यादी नेत्यांची नावे या यादीमध्ये आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरुवातीपासून मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको, अशी टोकाची भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आता यू टर्न घेण्याच्या तयारीत आहेत. अजित पवारांनी (Ajit Pawar) मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा, असा आदेश देत बारणे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे संकेत दिले आहेत.

Ajit Pawar
Kalyan News: कल्याण पूर्वमध्ये दूषित पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त, माजी नगरसेवकाचा थेट केडीएमसीला इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com