Kalyan News: कल्याण पूर्वमध्ये दूषित पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त, माजी नगरसेवकाचा थेट केडीएमसीला इशारा

Contaminated Water Supply In Kalyan: कल्याण पूर्वमध्ये दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Kalyan News
Kalyan NewsSaam Tv

अभिजीत देशमुख, साम टीव्ही कल्याण

Water Supply In Kalyan

कल्याणमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे.पाण्याची पाईप लाईन तत्काळ दुरुस्त करा. अन्यथा दूषित पाणी तुम्हाला पाजू, असा इशारा नागरिकांसह माजी नगरसेवकाने केडीएमसीला इशारा दिला (Contaminated Water Supply In Kalyan) आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (Latest Marathi News)

कल्याण पूर्व विजय नगर परिसरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे (Contaminated Water Supply) नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी यासंदर्भात वारंवार केडीएमसीकडे तक्रार केली आहे. परंतु केडीएमसीकडे वारंवार तक्रार करूनही अधिकारी कर्मचारी दाद देत नाहीत. त्यामुळे त्रस्त झालेल्य नागरिकांनी थेट टोकाचं पाऊल उचललं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज संतापलेल्या नागरिकांसह माजी नगरसेवक विष्णू गायकवाड यांनी थेट केडीएमसीचे कार्यलय गाठले. या दूषित पाणी पुरवठ्यासंबंधी जाब विचारत त्यांनी अधिकारी वर्गास धारेवर धरले (Water Supply In Kalyan) आहेत. त्यांनी केडीएमसीला तात्काळ पाण्याची पाईप लाईन तत्काळ दुरुस्त करा, अन्यथा हेच पाणी पाजू असा इशारा दिला आहे.

दरम्यान केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. तेव्हा त्यांना पाण्याची पाईपलाईन गटारातून जात असल्याचं दिसून आलं. ही पाईपलाईन लिकेज असल्यामुळे (Kalyan News) गटाराचे पाणी या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे, असं निदर्शनास आलं. तेव्हा त्यांनी लगेच कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

Kalyan News
Maharashtra Budget For KDMC: कल्याण, डोंबिवलीत यंदा कोणतीही करवाढ नाही; केडीएमसीचा ३ हजार १८२ कोटींचा अर्थसंकल्प

केडीएमसी (KDMC) अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. मात्र, या दरम्यान केडीएमसीचे पाणी विभागाचे व मलनिसरण विभागाचे अधिकारी एकमेकांना दोष देताना (Water Supply) आणि जबाबदारी झटकताना दिसून आले आहेत.

Kalyan News
KDMC Action Property Holders : KDMC ची 26 बड्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई; काय आहे कारण? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com