KDMC News : क्लस्टर योजनेची बायोमेट्रिक सर्वेक्षण करा; नागरिकांचे स्वतःच्याच तोंडाला काळे लावत आंदोलन

Kalyan Dombivali News : धोकादायक इमारतीतील नागरीक जीव मुठित धरुन वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे.
KDMC News
KDMC NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवली दत्तनगर आयरे परिसरात क्लस्टर योजना राबविली जाणार आहे. या योजनेकरीता बायोमेट्रीक (Dombivali) सर्वेक्षण केले जात आहे. मात्र काही भूमाफियांमुळे हे सर्वेक्षण बंद पडले आहे. त्यामुळे गरिबांना क्लस्टर योजनेतून हक्काचे घर मिळणार की नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करीत नागरीकांनी स्वत:च्या तोंडाला काळे फासून कल्याण- डोंबिवली महापालिका (KDMc) मुख्यालयावर निषेध मोर्चा काढला. (Latest Marathi News)

KDMC News
Nanded Accident : उपचारासाठी जाणाऱ्या पिता-पुत्राचा वाटेतच मृत्यू; ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झाला अपघात

भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक हे नागरीकांसह तोंडाला काळे लावून सहभागी झाले होते. धोकादायक इमारतीतील नागरीक जीव मुठित (Kalyan) धरुन वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. महापालिकेने ४१ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यापैकी सगळ्यात प्रथम कल्याणच्या (Kolsewadi) कोळसेवाडी आणि डोंबिवलीतील दत्तनगर आयरे परिसरात ही योजना प्रथम राबविली जाणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

KDMC News
Dhule News : शंभरहून अधिक प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रकार

त्याकरीता बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यासाठी १० कोटी रुपये खर्चाची निविदा मंजूर करुन हे काम एका एजन्सीला दिले आहे. या एजन्सीकडून काम सुरु करण्यात आले. डोंबिवलीतील दत्तनगर आयरे परिसरात बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम भूमाफिया कडून बंद पाडले जाते. सर्वेक्षण सुुरु करण्याची मागणी अनेकवेळा करुन देखील बंद पडलेले सर्वेक्षण सुरु झालेले नाही. सर्वेक्षण पोलिस संरक्षणात केले जाईल; असे लेखी पत्र महापालिकेने नायक आणि वेळासकर यांना दिले होते. मात्र महापालिका केवळ पत्र व्यवहार करुन प्रत्यक्षात कृती नाही. या विरोधात नागरिकांनी आंदोलन उभे केले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com