Madhya Pradesh Politics: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, विद्यमान खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Syed Jafar Joins BJP: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान खासदार सय्यद जफर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Syed Jafar Joins BJP
Syed Jafar Joins BJPSaam Tv
Published On

Lok Sabha Election 2024

मध्य प्रदेशातील छिंदवाडामधून काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांचे निकटवर्तीय विद्यमान खासदार सय्यद जफर (Syed Jafar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (latest politics news)

सय्यद जफर यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळ येथील भाजप कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व दिले (Madhya Pradesh Politics) आहे. सय्यद जफर यांनी काही दिवसांपूर्वी सीएएच्या बाजूने सोशल मीडियावर पोस्ट टाकून काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले होते.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस खासदार सय्यद जफर हे छिंदवाडा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा मोठा चेहरा मानले (Syed Jafar Joins BJP) जातात. कमलनाथ आणि नकुलनाथ यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. परंतु एकामागून एक कॉंग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

दुसरीकडे मध्य प्रदेशातील छिंदवाडा लोकसभा जागा (Lok Sabha) जिंकण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. राज्यातील लोकसभेच्या 29 जागांपैकी भाजपकडे 28 जागा (Madhya Pradesh Politics) आहेत, तर कमलनाथ यांच्याकडे एकमेव छिंदवाडा जागा आहे. आता भाजपला ही जागा कोणत्याही किंमतीत जिंकायची आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मोहन यादव आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान छिंदवाडा येथे सतत भेट देत (Lok Sabha Election 2024) आहेत.

Syed Jafar Joins BJP
Maharashtra Politics: 'शिवतीर्थावर काँग्रेसची सभा, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस', राहुल गांधींच्या सभेवर मुख्यमंत्री शिंदेंची टीका

आतापर्यंत काँग्रेसचे 60 हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा, मुख्यमंत्री मोहन यादव, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय (Politics News) यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलं होतं. काँग्रेसवरील जनतेचा विश्वास उडाला आहे, असा आरोपही पचौरी यांनी केला होता.

Syed Jafar Joins BJP
Maharashtra Politics: लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना धक्का! आणखी एका आमदाराने साथ सोडली; आज शिंदे गटात प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com