आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे जवळचे नेते माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासहित ३२ नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)
राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये जाट नेत्यांचा सामावेश आहे. काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या गोटामध्ये उत्साह दुणावला आहे. यामुळे भाजपने राजस्थानने पुन्हा एकदा २५ पैकी २५ जागा जिंकण्याचा दावा केला आहे.
काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे लालचंद कटारिया यांच्यासहित गहलोत यांच्या कार्यकाळातील मांजी मंत्री राजेंद्र यादव , माजी आमदार रिछपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, आलोक बेनीवाल, विजयपाल मिर्धा, रामपाल शर्मा यांचा सामावेश आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कटारिया म्हणाले, मुख्यमंत्री यादव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवीन ओळख मिळवून दिली आहे'.
दरम्यान या नेत्यांमध्ये माजी आमदार रामनारायण किसान, राजेंद्र परसवाल, शैतान सिंह मेहरडा, रामनारायण झाझडा, जगन्नाथ बुरडक, कर्मवीर चौधरी, अनिल व्यास, सेवानिवृत्त आयएएस औंकार सिंह चौधरी, गोपालराम कुकुणा, अशोक जांगिड, प्रिया सिंह मेघवाल, सुरेश चौधरी, कुलदीप ढेवा आणि बच्चू सिंह चौधरी या नेत्यांचा सामावेश आहे.
तसेच रामलाल मीणा, महेश शर्मा, रणजीत सिंह, मधुसूदन शर्मा, प्यारेलाल शर्मा, महेश शर्मा, रामखिलाड़ी शर्मा, रुघाराम महिया, सुनीता चौधरी, मदनलाल अटवाल आणि भींयाराम पेडीवाल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.