Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का? तीन वेळा आमदार राहिलेला बडा नेता अमित शाहांच्या भेटीला, भाजपमध्ये प्रवेश करणार?

Dilip Sananda News Update : दिलीप सानंदा यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला आहे. मुंबईत अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Congress Political News
Congress Political NewsSaam tv

संजय जाधव | बुलडाणा

Buldhana News :

काँग्रेस पक्षाला लागलेली गळती कमी होताना दिसत नाही. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे तीन वेळा बुलढाण्याच्या खामगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले दिलीप सानंदा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Latest Marathi News)

Congress Political News
Thane News : राज्य सरकारच्या कार्यक्रमात गणपत गायकवाड प्रमुख पाहुणे; ठाण्यातील 'नमो महारोजगार' मेळाव्याच्या पोस्टरवरुन वाद

दिलीप सानंदा यांनी देखील या चर्चांना दुजोरा दिला आहे. मुंबईत अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दिलीप सानंदा हे गेल्या अनेक दिवसापासून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.

दिलीप सानंदा हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. मात्र विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यापासून पक्षात त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिलीप सानंदा यांनी १९९९ साली खामगाव विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हापासून ते सलग २००९ पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.

मात्र २०१४ साली भाजपचे आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला आणि २०१९ साली त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

Congress Political News
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा होणार राजकीय भूकंप; ठाकरे गट भाजपशी हातमिळवणी करणार?

राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून गेली होती. त्यावेळी दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपकाही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात सष्क्रिय नसलेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com