Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Loksabha Election 2024 Bank Holiday: मुंबई, लखनऊसह देशातील 49 शहरांमध्ये सोमवारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या शहरातील नागरिकांनी उद्या बँकेमध्ये जाण्यापूर्वी याची नोंद घ्यावी.
Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील ठिकाणांची पाहा लिस्ट
Loksabha Election 2024 Bank HolidaySamm Tv

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) 5 व्या टप्प्यासाठी 20 मे म्हणजेच सोमवारी मतदान होणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मतदान होणार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. 20 मे रोजी देशातील 49 शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. देशातील 8 राज्यातील 49 शहरांमध्ये 20 मे रोजी बँका बंद राहणार आहेत. मुंबई, लखनऊसह देशातील 49 शहरांमध्ये सोमवारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या शहरातील नागरिकांनी उद्या बँकेमध्ये जाण्यापूर्वी याची नोंद घ्यावी.

लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी देशातील अनेक राज्यांमध्ये मतदान होणार आहे. 8 राज्यांतील 49 शहरांमध्ये उद्या मतदान होत आहे. मतदानामुळे या शहरांमध्ये सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका बंद राहणार आहेत. बिहार, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, मुंबई, लखनऊ, बेलापूरमध्ये बँका बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील ठिकाणांची पाहा लिस्ट
Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

बिहार, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, लडाख, महाराष्ट्र या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या दृष्टीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या 14 मतदारसंघ, महाराष्ट्राच्या 13 मतदारसंघ, पश्चिम बंगालच्या 7 मतदारसंघ, बिहारच्या 5 मतदारसंघ, ओडिशाच्या 5 मतदारसंघ, झारखंडच्या 3 मतदारसंघ, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या प्रत्येकी 1 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वांना मतदान करता यावे यासाठी बँकेला सुट्टी ठेवण्यात आली आहे. ही पगारी रजा असणार आहे म्हणजे यादिवशी बँका आणि सरकारी कार्यालये बंद राहतील आणि त्या दिवसाचा पगारही मिळेल.

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील ठिकाणांची पाहा लिस्ट
Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

देशातील या शहरांमध्ये बँका राहणार बंद -

महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण येथे मतदान होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बँका बंद राहतील.

उत्तर प्रदेशमध्ये मोहनलाल गंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा येथे मतदान होणार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.

ओडिशातील बारगढ, सुंदरगढ, बोलंगीर, कंधमाल आणि आस्कामध्ये मतदानामुळे बँका बंद राहणार आहेत.

झारखंडमधील चतरा, कोडरमा आणि हजारीबागमध्ये मतदानामुळे बँका बंद राहतील.

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील ठिकाणांची पाहा लिस्ट
Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com