जम्मू-काश्मीरमधील शोपियान आणि अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. शोपियांच्या हीरपुरा भागात दहशतवाद्यांनी भाजपच्या माजी सरपंचाला लक्ष्य करून त्यांची हत्या केली. टार्गेट किलिंग म्हणून दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणल्याचं सांगितलं जातंय. तर अनंतनागमघ्ये एका पर्यटक जोडप्यावर हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपशी संबंधित असलेल्या एका सरपंचाची हत्या करण्यात आलीय. एजाज अहमद शेख असे मृत माजी सरपंचाचे नाव आहे. अहमद शेख हे भाजपशी संबंधित होते. दरम्यान माजी सरपंचावर गोळीबार केल्यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले. दरम्यान, घटनेनंतर अहमद शेख यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
आणखी एका दहशतवादी हल्ला काश्मीरमधील अनंतनाग भागात झाला. येथे दोन पर्यटक जखमी झालेत. या दहशतवादी हल्ल्यात जयपूरमधील एक महिला आणि तिचा पती जखमी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या पर्यटकांवर अनंतनाग जिल्ह्यातील यन्नार भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. फरहा आणि तबरेज अशी या दोन्ही पर्यटकांची ओळख पटली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. दरम्यान या हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केलंय. 'आम्ही पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करतो, ज्यात दोन पर्यटक जखमी झाले होते आणि त्यानंतर हुरपोरा, शोपियान येथील सरपंचावर झालेला हल्ला - हे हल्ले चिंतेचे कारण आहेत. दक्षिणेच्या निवडणुका विनाकारण लांबल्या. हे हल्ले चिंतेचा विषय असल्याचं त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.