Lok Sabha Exit Polls: देशात सलग तिसऱ्यांदा मोदी लाट? 3 एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार, इंडिया आघाडीला किती जागा?

Lok Sabha Election 2024 Exit Polls LIVE: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशात सलग तिसऱ्यांदा मोदी लाट? 3 एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार, इंडिया आघाडीला किती जागा?
Pm Narendra Modi and Amit Shah Saam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलचे निकाल जाहीर होत आहेत. मोदी सरकार पुन्हा येण्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तीन सर्वेक्षणांमध्ये एनडीएला 400 हून अधिक जागा मिळेल, असं सांगण्यात आलं आहे.

तर स्कूल ऑफ पॉलिटिक्सने (SoP) AI तंत्रज्ञानावर आधारित एक्झिट पोल आणि मत सर्वेक्षण केले आहेत. त्यांच्या मते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला 367 ते 403 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणात एनडीए आघाडीला 49.30 टक्के मते मिळू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.

देशात सलग तिसऱ्यांदा मोदी लाट? 3 एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार, इंडिया आघाडीला किती जागा?
Maharashtra Exit Polls: पवार-ठाकरेंचं नाणं खणखणीत? एक्झिट पोलमध्ये ठाकरे दोन नंबरवर, पवारांच्याही जागा वाढणार?

स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्ष इंडिया आघाडीला 129 ते 161 जागा आणि इतरांना 7 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, या एक्झिट पोलनुसार इंडिया आघाडीला 38.40 टक्के मते मिळू शकतात आणि इतरांना 12.30 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे.

एसओपी व्यतिरिक्त इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाची सूत्रे हाती घेऊ शकतात. देशभरात भाजप आणि मोदी लाट दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 371 ते 401 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला 109 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 28 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Exit Polls 2024
Lok Sabha Exit Polls 2024Saam Tv
देशात सलग तिसऱ्यांदा मोदी लाट? 3 एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार, इंडिया आघाडीला किती जागा?
Maharashtra Exit Polls 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? पक्षफुटीनंतर 15 पैकी किती जागा जिंकणार?

याशिवाय न्यूज 24 टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसारही एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, भाजपला 335 ± 15 जागा मिळू शकतात, तर एनडीए आघाडीला 400 ± 15 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणात काँग्रेसला 50±11 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, इंडिया आघाडीला 107 ± 11 जागा आणि इतरांना 36 ± 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com