PM Modi Meditation : PM नरेंद्र मोदी ४५ तासांसाठी ध्यानधारणेला बसले, VIDEO बघा!

PM Modi Begins Meditation : तब्बल ४५ तास मोदी मौन व्रत धारण करून ध्यान करणार आहेत. त्यांच्या या ध्यान साधनेकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ध्यान व्रत सुरू असताना ते ध्यान कक्षेतूनही बाहेर येणार नाहीत.
PM Modi  Begins Meditation
PM Modi MeditationSaam TV

सध्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या ४ जूनाला निकाल जाहीर होणार आहेत. अशात कन्याकुमारीमधील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ध्यान साधनेला सुरूवात केली आहे. काल (गुरुवारी) संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. त्यामुळे या ध्यान साधनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.

PM Modi  Begins Meditation
PM Modi: प्रचार संपल्यानंतर PM मोदी करणार ध्यानधारणा, यंदा तामिळनाडूत जाणार; कसं असणार शेड्युल?

४५ तासांचे मौन व्रत

विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्यान साधनेला सुरुवात झाली आहे. यासाठी मोदी तब्बल ४५ तास मौन व्रत धारण करून ध्यान करणार आहेत. त्यांच्या या ध्यान साधनेकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ध्यान व्रत सुरू असताना ते ध्यान कक्षेतूनही बाहेर येणार नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद यांचे विचार आधीपासूनच मानतात. त्यांच्या विचारांचा मोदींवर प्रभाव आहे. विवेकानंद यांना कन्याकुमारीत जीवनाचे लक्ष्य मिळाले. येथे भारताच्या दक्षिणी भागात कन्याकुमारीत पूर्व आणि पश्चिम तट एकत्र येतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी ध्यान साधनेसाठी या ठिकाणाची निवड केली.

४५ तास अन्नाचा एक कणही खाणार नाहीत

ध्यान साधना ४५ तासांची आहे. या काळात पंतप्रधान मोदी अन्नाचा एक कणही खाणार नाहीत. संपूर्ण ध्यान साधना ते फक्त लिक्विड डाएटवर करणार आहेत.

काल कन्याकुमारीत पोहचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवती अम्मान मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांनी पूजा केली. पुढे विवेकानंद रॉक मेमोरियल येथून त्यांनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे.

PM Modi  Begins Meditation
Narendra Modi: PM मोदी यांची उमेदवारी रद्द करण्याबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली, नेमकं प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com