Maharashtra Exit Polls: पवार-ठाकरेंचं नाणं खणखणीत? एक्झिट पोलमध्ये ठाकरे दोन नंबरवर, पवारांच्याही जागा वाढणार?

Maharashtra Exit Polls 2024 Prediction: पोल ऑफ पोलमध्ये एनडीएला कौल मिळाला असला तरी महाराष्ट्रात मात्र मविआला मोठं यश मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सर्वात लक्षवेधी म्हणजे पक्ष फुटूनही पवार आणि ठाकरे जोरदार कामगिरी करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
पवार-ठाकरेंचं नाणं खणखणीत? एक्झिट पोलमध्ये ठाकरे दोन नंबरवर, पवारांच्याही जागा वाढणार?
Maharashtra Exit Poll 2024Saam Tv

विनोद पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभा निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांनी देशात पुन्हा एनडीएचंच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. महाराष्ट्रात मात्र भाजपच्या 45 प्लसच्या नाऱ्याला सुरूंग लागताना दिसतोय. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार महाराष्ट्रात महायुतीच्या निम्मे जागा कमी होण्याची शक्यता आहे. पवार आणि ठाकरेंना मिळालेली सहानुभूती महायुतीच्या यशातला मोठा अडथळा असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.

महायुतीला 26 तर मविआला 21 जागा, इतरांना केवळ एक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही राज्यात ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष म्हणून उदयाला येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर पवारांच्या जागांमध्ये तब्बल दुपटीनं वाढ होण्याचा अंदाज पोल ऑफ पोलमध्ये दाखवलाय.

पवार-ठाकरेंचं नाणं खणखणीत? एक्झिट पोलमध्ये ठाकरे दोन नंबरवर, पवारांच्याही जागा वाढणार?
Maharashtra Exit Polls 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? पक्षफुटीनंतर 15 पैकी किती जागा जिंकणार?

पोल ऑफ पोलमध्ये भाजपला 18 जागांचा अदांज व्यक्त करण्यात आलाय. शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. मविआतल्या काँग्रेसला सहा जागा मिळण्याची शक्यता असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागांचा मिळण्याचा अदांज व्यक्त करण्यात आलाय. शरद पवारांची राष्ट्रवादीला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे.

पक्ष फुटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांमध्ये सहानुभूती आहे. आणि हीच सहानुभूती मतदानापर्यंत टिकू नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रचारादरम्यान ठाकरे आणि पवारांवर टोकाची टीका केली गेली.

पवार-ठाकरेंचं नाणं खणखणीत? एक्झिट पोलमध्ये ठाकरे दोन नंबरवर, पवारांच्याही जागा वाढणार?
Delhi Exit Polls 2024: कन्हैया कुमार VS मनोज तिवारी; एक्झिट पोलमध्ये कोण पुढे? दिल्ली कोण काबीज करणार?

याची कल्पना महायुतीच्या नेत्यांना होती. ही सहानुभूती टिकू नये, यासाठी महायुतीच्या नेत्यांना आटोकाट प्रयत्न केले. त्यातून ठाकरे, पवार यांच्यावर टोकाची टीका केली जाऊ लागली. मात्र त्याचा परिणाम उलटा होत गेल्याचं चित्र एक्झिट पोलमधून दिसून येतंय. हे आकडे खरे ठरले तर महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध होईल. मात्र त्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागणार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com