Delhi Exit Polls 2024: कन्हैया कुमार VS मनोज तिवारी; एक्झिट पोलमध्ये कोण पुढे? दिल्ली कोण काबीज करणार?

Lok Sabha Election Exit Poll: लोकसभा निवडणुकीसाठीच्या सातही टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल अंदाज समोर येत आहे. यानुसार, दिल्लीत पुन्हा मोदींची लाट असल्याचं चित्र आहे.
कन्हैया कुमार VS मनोज तिवारी; एक्झिट पोलमध्ये कोण पुढे? दिल्ली कोण काबीज करणार?
Kanhaiya Kumar vs Manoj TiwariSaam Tv

दिल्लीबाबतच्या सर्व एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसपेक्षा खूप पुढे राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बहुतांश सर्वेमध्ये भाजपला 5-7 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला जास्तीत जास्त दोन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यातील दिल्लीतील सर्वात मोठ्या लढतीच्या निकालाबाबतही अदांज समोर आला आहे.

आज तक ॲक्सिस माय इंडियाने ईशान्य दिल्ली जागेचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. यानुसार, कन्हैया कुमार आणि मनोज तिवारीही लढत भाजपच्या बाजूने जाऊ शकते, असे शनिवारी चॅनलवर प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणातून सांगण्यात आलं आहे.

कन्हैया कुमार VS मनोज तिवारी; एक्झिट पोलमध्ये कोण पुढे? दिल्ली कोण काबीज करणार?
Maharashtra Exit Polls 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? पक्षफुटीनंतर 15 पैकी किती जागा जिंकणार?

दिल्लीत या जागेवर सर्वाधिक मतदान झाले आहे. 25 मे रोजी मतदानाच्या दिवशी या जागेच्या बूथवर 62.89 टक्के मतदार पोहोचले होते, तर दिल्लीत एकूण 58.69 टक्के मतदान झाले होते.

आज तक ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार, मनोज तिवारी पुन्हा एकदा ईशान्य दिल्लीच्या जागेवरून जिंकून हॅटट्रिक करू शकतात. दिल्लीतील ते एकमेव भाजप खासदार आहेत, ज्यांना भाजपने यावेळी पुन्हा संधी दिली होती. इतर सर्व सहा खासदारांची तिकिटे कापून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती.

कन्हैया कुमार VS मनोज तिवारी; एक्झिट पोलमध्ये कोण पुढे? दिल्ली कोण काबीज करणार?
Lok Sabha Exit Polls LIVE: नव्या संसदेत नवं सरकार कुणाचं? INDIA आघाडी की NDA? एक्झिट पोलची इंटरेस्टिंग आकडेवारी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ईशान्य दिल्लीत कन्हैया कुमारचा प्रचार केला होता. मुख्यमंत्र्यांनी जनतेला कन्हैया कुमारला मतदान करून 'रिंकिया के पापा'चा पराभव करण्याचे आवाहन केले होते. मात्र एक्झिट पोलमधून निकाल वेगळाच येताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com