एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? पक्षफुटीनंतर 15 पैकी किती जागा जिंकणार?
Maharashtra Exit Polls 2024Saam Tv

Maharashtra Exit Polls 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? पक्षफुटीनंतर 15 पैकी किती जागा जिंकणार?

Exit poll results LIVE: लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांसाठी मतदान संपलं असून 4 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. यातच राज्यात शिंदे गट किती जागा जिंकणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Published on

आज देशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपलं आहे. यातच राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात संपली आहे. आजपासून तीन दिवसांनी म्हणजे 4 जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. याच आधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? याकडे राज्यच लक्ष लागलं आहे.

पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच निवडणुकीला समोर जात आहेत. यातच राज्यातील जनतेने त्यांच्या बाजूने की, त्यांच्या विरोधात कौल दिला आहे, हे आता एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलं आहे. राज्यातील 45 लोकसभा जागांपैकी शिवसेना शिंदे गटाने 15 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.

शिवसेना शिंदे गटाच्या किती जागा येणार निवडून?

सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या 15 पैकी 6 जागा निवडून येऊ शकतात. तर पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसार, शिंद गटाला 6 जागा मिळू शकतात, असं सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटाला किती जागा मिळण्याचा अंदाज?

यावेळी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांची थेट लढतही ठाकरे गटाच्या उमेदवारांशी आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे हेही पहिल्यांदाच निवडणुकीस सामोरे जात आहेत. आतापर्यंत एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार ठाकरे गटाला दोन नंबरच्या सर्वाधिक जागा मिळणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यातच सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, शिवसेना ठाकरे गट 9 जागा जिंकू शकतो, असा अंदाज आहे. तर पोल ऑफ पोलच्या एक्झिट पोलनुसारही ठाकरे गट 9 जागा जिंकू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com