Andhra Pradesh Elections: मतदान केंद्रावर आमदाराची मतदाराला बेदम मारहाण, Video समोर; नेमकं काय घडलं?

MLA Beat Voter: आंध्र प्रदेशमध्ये देखील आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आंध्रप्रदेशचे आमदार शिवाकुमार यांनी मतदाराला मारहाण केली आहे.
 Andhra Pradesh Elections
Andhra Pradesh ElectionsYandex

आंध्र प्रदेशमध्ये देखील आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आंध्रप्रदेशचे आमदार शिवाकुमार यांनी मतदाराला मारहाण केली आहे.आमदार शिवाकुमार हे मतदान करण्यासाठी आले होते. तेव्हा ते मतदानाच्या रांगेतुन पुढे जात असल्यामुळे एका मतदाराने त्यांना रांगेत उभं राहायला सांगितलं. तेव्हा संतापलेल्या आमदार शिवाकुमार ( Andhra Pradesh Elections 2024) यांनी मतदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. आमदार शिवाकुमार यांनी मतदाराला मारहाण केली आहे. आंध्रप्रदेशच्या गुंटूरमधील हा धक्कादायक प्रकार आहे.

आमदार शिवाकुमार यांनी मतदाराला मतदान केंद्रावर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आमदार शिवाकुमार (Andhra Pradesh News) यांनी मतदाराला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे मतदारांमध्ये दहशतीचं वातावरण दिसून आलं आहे. आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये मतदान केंद्रावर तुफान राडा झाला आहे.

या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील आहे. येथे तेनालीचे आमदार शिवकुमार यांना मतदान रांगेत उभे राहण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे त्यांनी मतदारावर हात (MLA Beat Voter) उचलल्याची घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये आमदार शिवाकुमार आणि मतदार यांच्यात वाद होताना दिसत आहे. तर कार्यकर्त्यांसह आमदार शिवाकुमार यांनी या मतदाराला मारहाण केल्याचं दिसत आहे.

 Andhra Pradesh Elections
Ahmednagar Lok Sabha: अहमदनगरमध्ये सुजय विखे अन् निलेश लंकेंचे कार्यकर्ते भिडले; रस्त्यावर पडलेली ती पैशांची बॅग कुणाची? VIDEO व्हायरल

आंध्र प्रदेशमध्ये आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. तेथे लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका एकाच वेळी होत आहेत. दरम्यान, गुंटूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर हाणामारी झाल्याचा व्हिडिओ (Lok Sabha 2024) समोर आला आहे. आमदार शिवाकुमार यांच्या समर्थकांनी मतदाराला बेदम मारहाण केल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज आंध्र प्रदेशातील २५ जागांसाठी मतदान होत आहे. मचदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसत आहे.

 Andhra Pradesh Elections
Lok Sabha 2024: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com