Aaditya Thackeray Vs Shrikant Shinde : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये का पाठवले? आदित्य ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंच्या टीकेवर हल्लाबाेल, Video

Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यात लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या प्रचारात ठाकरे विरुद्ध शिंदे गट एकमेकांवर टीका करताना दिसत आहे.
aaditya thackeray criticizes shrikant shinde
aaditya thackeray criticizes shrikant shinde Saam Digital

- रणजीत माजगावकर/ अभिजीत देशमुख

Maharashtra Lok Sabha Election :

आदित्य ठाकरे मृगजळातून बाहेर आले नाहीत. दोन वर्षांपासून ते शिव्या शाप देत आहेत पण लोकांना माहिती आहे कोण कामाचे आहे. आदित्य ठाकरे बोलतात ते स्वतःसाठी बोलतात, पण शिंदे साहेब जनतेसाठी काम करतात अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी काेल्हापूर येथे ठाकरेंवर केली. त्यास ठाकरेंनी प्रतिउत्तर देत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका असे म्हणत महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये का पाठवले? असा सवाल केला.

श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या रोड शो विषयी काेल्हापूर येथे बाेलताना कल्याणमध्ये आम्ही जिंकणार आहोत. निवडणूक आहे म्हटल्यावर रोड शो सगळे करणार. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेला कल्याणाचे नागरिक मोठ्या संख्येने निवडून देतील असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

पुढं बाेलताना शिंदे म्हणाले आदित्य ठाकरे मृगजळातून बाहेर आले नाहीत. दोन वर्षांपासून ते शिव्या शाप देत आहेत पण लोकांना माहिती आहे कोण कामाचे आहे. आदित्य ठाकरे बोलतात ते स्वतःसाठी बोलतात, पण शिंदे साहेब जनतेसाठी काम करतात असेही श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.

aaditya thackeray criticizes shrikant shinde
Dhule Constituency : धुळ्यातील काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर अखेर पडला पडदा, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेरांमुळे शाेभा बच्छाव यांची वाढली ताकद

श्रीकांत शिंदेंकडे जास्त लक्ष देऊ नका : आदित्य ठाकरे

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले श्रीकांत शिंदे यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. अनेकदा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देऊन त्यांनी समोर येऊन बसावं. महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये का पाठवले?, महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष काढलेला आहे त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डेबिट करावे. त्यांच्यात ती हिंमत नाही. त्यामुळे इकडून तिकडून चिंधीचोर आमच्यावर बोलायला पाठवत असतात अशी टिप्पणी ठाकरेंनी शिंदेवर केली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

aaditya thackeray criticizes shrikant shinde
Dhananjay Mahadik Vs Satej Patil: मुश्रीफांवर झालेल्या अन्यायाचा धनंजय महाडिकांनी वाचला पाढा, कागलकरांना वचपा काढण्याचं केलं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com