Samsung AI Home: तुमचं घर होणार आणखी स्मार्ट; सॅमसंग AI Home च्या मदतीने लाइट्सपासून एसीपर्यंत सर्व काही आपोआप नियंत्रित

Smart home technology: घर म्हटले की आपल्याला एक शांत आणि आरामदायक जागा आठवते, पण आता तंत्रज्ञानामुळे (Technology) घर अधिक स्मार्ट (Smarter Home) आणि कार्यक्षम बनत आहे. सॅमसंगने (Samsung) आणलेल्या 'एआय होम' (AI Home) संकल्पनेमुळे तुमचे घर पूर्णपणे तुमच्या सवयींनुसार काम करेल.
Samsung AI Home
Samsung AI Homesaam tv
Published On

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज जिओ वर्ल्‍ड, प्‍लाझा, बीकेसी, मुंबईतील त्‍यांच्‍या प्रमुख स्‍टोअरमध्‍ये ‘एआय होम: फ्यूचर लिव्हिंग, नाऊ'साठी दृष्टिकोनाचं अनावरण केलं. सॅमसंग एआय होम नेक्‍स्‍ट-जनरेशन कनेक्‍टेड लिव्हिंग परिसंस्‍था आहे, जी अप्‍लायन्‍सेस, डिवाईसेस आणि सर्विसेसना एकत्र करत अद्वितीय सोयीसुविधा, ऊर्जा कार्यक्षमता व वैयक्तिकृत अनुभव देतं.

काय आहे याची खासियत?

या लाँचची खासियत म्‍हणजे सॅमसंगचा फ्यूचर लिव्हिंग दृष्टिकोन. सर्वोत्तमता फक्‍त एकाच डिवाईसपर्यंत मर्यादित न राहता प्रत्‍येक स्क्रिन, अप्‍लायन्‍स आणि सर्विसमध्‍ये शेअर केलं जाईल असं विश्व घडवणं. एआय होममध्‍ये तीन मूलभूत क्षमतांच्‍या माध्‍यमातून या दृष्टिकोनाचा समावेश आहे. या तीन क्षमता म्हणजे सॅमसंगचे एआयमधील नेतृत्‍व, डिवाईस पोर्टफोलिओची अद्वितीय सखोलता आणि विश्वसनीय, सुरक्षित परिसंस्‍था.

तुम्ही अशी कल्पना करा की, घर तुम्‍हाला ओळखतं. तुम्‍ही घरामध्‍ये येताच लाइट सुरू होतात, झोपेदरम्‍यान तापमानानुसार एअर कंडिशनर एडजस्ट होतं, वॉशिंग मशिन योग्‍य पद्धतीने काम करते आणि टीव्‍ही तुमच्‍या आवडत्‍या सिरीज एकामागोमाग सुरू करतो, हे सर्व आपोआपपणे होतं. सॅमसंग एआय होम फक्‍त काहीजणांसाठी नाही तर सर्वांसाठी या कल्पनेला शक्‍य करणार आहे.

Samsung AI Home
WhatsApp Ticketing : खुशखबर! मुंबई लोकल ट्रेनचं तिकीट बुकिंग आता WhatsAppवर होणार, फक्त Hi” म्हणा आणि तिकीट मिळवा

अॅम्बियन्ट इंटेलिजण्‍ससह सिस्‍टम सतत युझर्सना वर्तणूकीला आणि आसपासच्‍या वातावरणाला जाणून घेतं, ज्‍यानंतर आपोआपपणे आरामदायीपणा, केअर, ऊर्जा बचत आणि सुरक्षितता देतं. तुम्‍ही आराम करत असताना उत्‍साही वातावरण देणाऱ्या एसीपासून तुमच्‍या आहारसंबंधित सल्‍ला देणारा फ्रिज अशा स्‍मार्टथिंग्‍ज-सक्षम डिवाईसेसपर्यंत प्रत्‍येक परस्‍परसंवाद संदर्भीय, मानव-केंद्रित सर्वोत्तम असतो.

भारतात आता फ्यूचर लिव्हिंग

सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व सीईओ जेबी पर्क यांनी सांगितलं की, “सॅमसंगमध्ये आम्ही आमच्या स्मार्टथिंग्ज परिसंस्थेच्या माध्यमातून गॅलेक्सी एआय, व्हिजन एआय आणि बीस्पोक एआयचं एकत्रिकरण करत आहोत. एआयचं भविष्य कसं असेल आणि ते लोकांच्या दैनंदिन जीवनात कसं सामावलं जाईल, याची कल्पना आम्ही करत आहोत. भारतात ‘सॅमसंग एआय होम’ लाँच करून आम्ही इथल्या घराघरांत भविष्याची राहणीमान पद्धत आणत आहोत.

जेबी पर्क यांनी पुढे सांगितलं की, यामुळे जीवन अधिक सोयीस्कर, कार्यक्षम, आरोग्यदायी आणि सुरक्षित बनवणार आहे. या प्रवासात भारताची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आमची तीन आरअँडडी केंद्रं इथे नवनवीन एआय तंत्रज्ञान विकसित करत आहेत आणि ते जागतिक पातळीवर पोहोचवत आहेत. या लाँचमुळे आमचं भारतातील लाखो कुटुंबांच्या जीवनशैलीत बदल घडवण्याचं आणि सुरक्षित, उपयुक्त तंत्रज्ञान देण्याचं वचन दिसून येतं.”

Samsung AI Home
WhatsApp New Feature: चॅट वाचायची चिंता नाही! WhatsApp लवकरच आणणार आहे AI बेस्ड फीचर

एआय होम म्हणजे काय?

सॅमसंग एआय होम हे घरासाठी तयार केलेलं स्मार्ट सिस्टम आहे. यात गॅलेक्सी एआय, व्हिजन एआय आणि बीस्पोक एआय यांचा समावेश आहे.

गॅलेक्सी एआय – मोबाईल व वेअरेबल्ससोबत काम करतं. चालता-बोलता उत्पादनक्षमता वाढवणं आणि आरोग्याची काळजी घेणं यात मदत करतं.

व्हिजन एआय – टीव्हीमध्ये वापरलं जातं. यातून नैसर्गिक भाषेत संवाद साधता येतो आणि स्मार्ट शिफारशी मिळतात.

Samsung AI Home
WhatsApp Storage: WhatsApp फोटो-व्हिडिओमुळे स्टोरेज भरते? 'ही' सेटिंग लगेच ऑफ करा

बीस्पोक एआय – घरगुती उपकरणांमध्ये वापरलं जातं. यामुळे घरकामांची पूर्वकल्पना घेण्याची गरज राहत नाही.

ही सगळी वैशिष्ट्यं एकत्र येऊन एक असं घर तयार करतात जे तुमच्या गरजेनुसार काम करतं. यासाठी खास स्मार्टथिंग्ज अॅप आहे, जे हजारो डिव्हाइससोबत सॅमसंग उत्पादनांना जोडतं.

हे घर तुमच्या सवयी, गरजा आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ओळखतं. हेच आहे – फ्यूचर लिव्हिंग, नाऊ.

Samsung AI Home
Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

सॅमसंग एआय होमची चार खास वैशिष्ट्यं

ईज (Ease)

हे वैशिष्ट्य जीवन सोपं करतं. घरातील रोजची कामं आपोआप पूर्ण होतात. जणू एखादा खासगी द्वारपाल तुमच्यासाठी काम करत आहे असं वाटतं. लाइट्स, तापमान आणि इतर घरकामं आपोआप समायोजित होतात. त्यामुळे वेळ वाचतो आणि ऊर्जा बचत होते.

केअर (Care)

हे कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य देतं. डिव्हाइस आणि सर्विसेसच्या मदतीने हे तुमच्या झोपेच्या सवयींवर लक्ष ठेवतं, आरोग्य तपासून पोषण नियोजन करतं. इतकंच नाही तर पाळीव प्राण्यांचीही काळजी घेतं.

Samsung AI Home
WhatsApp New Feature: फक्त एक सेटिंग करा अन् WhatsApp स्टेटस निवडलेल्या व्यक्तीला त्वरित मिळेल नोटिफिकेशन

सेव्ह (Save)

ऊर्जेचा वापर कमी करून खर्चात बचत करण्यावर भर देतं. स्मार्टथिंग्ज एनर्जी वापरल्यास घरं अधिक कार्यक्षम होतात. उदाहरणार्थ, वॉशिंग मशीनच्या वापरातील ऊर्जा जवळपास ७०% पर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे वीजबिल कमी होण्यासोबतच पर्यावरणालाही फायदा होतो.

सिक्युअर (Secure)

सुरक्षिततेला प्राधान्य देणारं हे वैशिष्ट्य आहे. सॅमसंग नॉक्स वॉल्ट संवेदनशील माहितीचं संरक्षण हार्डवेअर पातळीवर करतं. तर नॉक्स मॅट्रिक्स ब्लॉकचेन-आधारित सुरक्षा देते. यामुळे घरातील कुटुंबियांना खात्री मिळते की त्यांचं डिजिटल जीवन तितकंच सुरक्षित आहे जितकं वास्तव जीवन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com