WhatsApp Ticketing : खुशखबर! मुंबई लोकल ट्रेनचं तिकीट बुकिंग आता WhatsAppवर होणार, फक्त Hi” म्हणा आणि तिकीट मिळवा

Mumbai Local : मुंबई लोकलसाठी WhatsAppवर तिकीट बुकिंगची सुविधा सुरु. फक्त "Hi" मेसेज करा आणि तिकीट मिळवा. लांब रांगांना विसरून डिजिटल बुकिंगचा अनुभव घ्या.
Mumbai local train ticket WhatsApp
IRCTC WhatsApp bookinggoogle
Published On

Digital Ticket Booking System : मुंबईकरांना आता रेल्वे तिकीटाच्या रांगेत थांबण्याची गरज नाही. नुकतेच तुमचा प्रवास सोपा करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने आता मुंबई लोकल ट्रेनसाठी WhatsApp चॅटद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या पद्धतीमुळे लाखो प्रवाशांना लांबच लांब रांगा, गुंतागुंतीच्या अ‍ॅप्स आणि काउंटरवरील गोंधळ यापासून सुटका मिळणार आहे.

भारतीय रेल्वेने ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत आपल्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला आहे. WhatsApp हे चॅट प्लॅटफॉर्म आता तिकीट बुकिंगसाठी वापरण्याचा प्रस्ताव असून, यासाठी तांत्रिक बाबी आणि सुरक्षिततेच्या अटींची पूर्तता होताच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. प्रवाशांना फक्त स्थानकांवर प्रदर्शित QR कोड स्कॅन करावा लागेल आणि WhatsApp चॅटवर "Hi" पाठवले की, बुकिंगसाठी मेनू उपलब्ध होईल.

Mumbai local train ticket WhatsApp
Hidden Konkan : पावसाळ्यात माणगांवजवळील हे स्वर्गाहून Hidden धबधबे एकदा नक्की पाहा

सध्या मुंबई लोकल प्रवासासाठी फक्त २५ टक्के प्रवासी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करत आहेत. मात्र स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे आणि WhatsAppसारख्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या प्लॅटफॉर्मचा समावेश झाल्यास ही संख्या लक्षणीय वाढू शकते, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. यामागे मुंबई मेट्रोची यशस्वी WhatsApp बुकिंग प्रणाली प्रेरणा ठरली आहे. जिथे सध्या ६७ टक्के प्रवासी ही सुविधा वापरतात.

या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. सध्याच्या UTS (Unreserved Ticketing System) QR आधारित मॉडेलमध्ये काही गैरवापराची प्रकरणे आढळल्याने, WhatsApp बुकिंगसाठी अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय सोल्यूशन तयार करण्यावर भर दिला जात आहे.

अद्याप ही सेवा अधिकृतपणे सुरू झालेली नसली तरी ती अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या काही महिन्यांत मुंबईकरांसाठी WhatsApp तिकीट बुकिंग प्रणाली प्रत्यक्षात येऊ शकते. एकदा ही प्रणाली लागू झाली की, लोकल ट्रेनसाठी तिकीट मिळवणे एखाद्या चॅटमधून "Hi" पाठवण्याइतकं सोपं आणि जलद गतीने होणार आहे.

मुंबईसारख्या गतिमान शहरात वेळेचा अपव्यय कमी करणे आणि डिजिटल सुविधा पोहोचवणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे लवकरच WhatsApp हेच नवे लोकल तिकीट बुकिंग केंद्र ठरण्याची शक्यता आहे. तुमचा पुढचा प्रवास आता फक्त एका मेसेजच्या अंतरावर आहे.

Mumbai local train ticket WhatsApp
Purva Bhadrapada Nakshatra : पूर्वा भाद्रपदा नक्षत्र; रविवारचा दिवस ठरणार बदलांचा! वाचा संपूर्ण भविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com