WhatsApp New Feature: चॅट वाचायची चिंता नाही! WhatsApp लवकरच आणणार आहे AI बेस्ड फीचर

Dhanshri Shintre

फीचर लॉन्च

व्हॉट्सअॅप लवकरच यूजर्ससाठी एक AI-आधारित फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

नवीन फीचर

क्विक रिकॅप नावाचं हे नवीन फीचर तुमचे चॅटिंग अधिक सोपे आणि वेगवान करण्यासाठी व्हॉट्सअॅप आणत आहे.

संक्षिप्त सारांश

हा फीचर यूजर्सना न वाचलेल्या मेसेजचा संक्षिप्त सारांश देईल, ज्यामुळे वेळ वाचेल आणि लांबच्या चॅट्स सहज समजतील.

पाच चॅट्सचा सारांश

क्विक रिकॅप फीचर एकाच वेळी पाच चॅट्सचा सारांश तयार करू शकते आणि हे मेटा एआयच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे.

प्रायव्हसी मेसेजेस

या फीचरमध्ये यूजर्सची गोपनीयता पूर्ण सुरक्षित राहील; एआय खाजगी पद्धतीने सारांश तयार करेल आणि अॅडव्हान्स्ड प्रायव्हसी मेसेजेस वगळले जातील.

बीटा अँड्रॉइड

क्विक रिकॅप फीचर सध्या फक्त व्हाट्सअॅप बीटा अँड्रॉइड v2.25.21.12 या बीटा आवृत्तीत उपलब्ध आहे.

व्हॉट्सअॅप क्विक रिकॅप

ज्यांचे दररोज अनेक चॅट्स चुकतात किंवा ऑफिस ग्रुपमध्ये मेसेज येतात, त्यांच्यासाठी व्हॉट्सअॅप क्विक रिकॅप उपयुक्त ठरेल.

NEXT: युजर्ससाठी खुशखबर! इन्स्टाग्रामवर लवकरच ऑटो रील स्क्रोल फीचर येणार? कसे करणार काम

येथे क्लिक करा