Instagram Feature: युजर्ससाठी खुशखबर! इन्स्टाग्रामवर लवकरच ऑटो रील स्क्रोल फीचर येणार? कसे करणार काम

Dhanshri Shintre

लोकप्रियता

टिकटॉक बंद झाल्यानंतर इन्स्टाग्राम रील्सने भारतात लोकप्रियता मिळवली असून करोडो लोक त्याचा सक्रिय वापर करत आहेत.

व्यसन

अनेक लोक सतत रील्स स्क्रोल करताना दिसतात, ज्यामुळे त्यांना याचे व्यसन लागल्याचे चित्र पाहायला मिळते.

फीचर येणार

आता इन्स्टाग्रामवर लवकरच ऑटो स्क्रोल फीचर येणार असून, यामुळे रील्सचे व्यसन अधिक तीव्र होऊ शकते.

स्क्रोल

हे फिचर सुरू केल्यावर एक रील संपताच दुसरी आपोआप सुरु होईल, स्क्रोल करण्याची गरज उरणार नाही.

रील स्क्रोल करण्याची गरज

हे फिचर वापरल्यास युजर्सना रील स्क्रोल करण्याची गरज भासणार नाही, नेटफ्लिक्स ऑटोप्लेप्रमाणेच अनुभव येऊ शकतो.

अधिकृत माहिती

सध्या इन्स्टाग्रामच्या ऑटो रील स्क्रोल फिचरबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही, हे केवळ अफवा असल्याचे संकेत मिळत आहेत.

चर्चा सुरु आहे

पुढील काळात इन्स्टाग्रामकडून या फीचरची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू आहे.

नकारात्मक परिणाम

ऑटो स्क्रोल फीचरमुळे युजर्स सतत रील्समध्ये गुंतले जाऊ शकतात, ज्याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

NEXT: मोबाईल-लॅपटॉप चार्जर सतत प्लग इन ठेवता? वाचा तुमच्या वीज बिलावर होणारा परिणाम

येथे क्लिक करा