Dhanshri Shintre
अनेक घरांमध्ये मोबाईल आणि लॅपटॉप चार्जर सतत चालू ठेवले जातात, जे वीजेचा अनावश्यक वापर वाढवते.
ही फक्त एका घरातील घटना नाही, तर असंच अनेक घरांमध्ये सतत घडत असलेली गोष्ट आहे.
ही समस्या फक्त घरातील वीज बिल देणाऱ्या सदस्यालाच जाणवते आणि त्यालाच याचा फटका बसतो.
पण तुम्हाला माहित आहे का, या छोट्याशा चुकीमुळे महिन्याच्या शेवटी वीज बिलात मोठी वाढ होऊ शकते.
मोबाईल चार्जर सतत सॉकेटमध्ये ठेवल्यास वीज वापर वाढतो आणि महिन्याच्या शेवटी बिलामध्ये १ ते २ पट वाढ होऊ शकते.
लॅपटॉप चार्जर सतत सॉकेटमध्ये ठेवल्यास तोही वीज वापरतो आणि अनावश्यक खर्चामुळे वीज बिल वाढण्याची शक्यता असते.
घरात अनेक चार्जर सतत जोडले असल्यास, त्यांची वीज खपत एकत्रितपणे वाढते आणि बिलात मोठी वाढ होऊ शकते.
म्हणून वापर नसेल तेव्हा चार्जर सॉकेटमधून अनप्लग करा, जेणेकरून वीजेची बचत आणि बिल कमी होईल.
ही सवय वीज बिल कमी करते, विजेचा धक्का टाळते आणि चार्जरचे आयुष्य वाढवण्यास देखील मदत करते.