WhatsApp New Feature: फक्त एक सेटिंग करा अन् WhatsApp स्टेटस निवडलेल्या व्यक्तीला त्वरित मिळेल नोटिफिकेशन

WhatsApp Status: जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही महत्त्वाची अपडेट आहे. आता तुम्ही तुमच्या स्टेटस पाहणाऱ्यांना सहज ओळखू शकता आणि ते कोणासाठी शेअर केले आहे हे स्पष्ट दिसेल.
WhatsApp New Feature: फक्त एक सेटिंग करा अन् WhatsApp स्टेटस निवडलेल्या व्यक्तीला त्वरित मिळेल नोटिफिकेशन
Published On

व्हॉट्सअॅपची ओळख

जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपची ओळख आहे. ३.५ अब्जांहून अधिक लोक या अॅपचा वापर करतात. सोपी रचना, वेगवान सेवा आणि सुरक्षितता यामुळे हे अॅप यूजर्सचे पहिले पसंतीचे साधन ठरले आहे.

नवनवीन फीचर्स

लाखो यूजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका खास फीचरची माहिती देणार आहोत जे दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

खास क्षण व्यक्त करण्यासाठी उपयोग

आजच्या घडीला WhatsApp केवळ मेसेजिंग, कॉलिंग किंवा फाईल्स शेअर करण्यापुरते मर्यादित नाही. यूजर्स आपल्या भावना, आठवणी आणि खास क्षण व्यक्त करण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनातील अनुभव शेअर करण्यासाठी WhatsApp स्टेटसचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.

WhatsApp स्टेटस

WhatsApp वर टाकलेले स्टेटस २४ तासांनंतर आपोआप गायब होते. अनेकदा खास व्यक्तीला भावना पोहोचवण्यासाठी स्टेटस ठेवले जाते, पण वेळ संपतो. आता या अडचणीवर उपाय येत असून वापरकर्त्यांची चिंता कमी होणार आहे.

तुमचे स्टेटस लगेच दिसेल

यूजर्सची अडचण दूर करण्यासाठी WhatsApp ने नुकतेच Status मध्ये "Mention Contacts" हे नवे फीचर आणले आहे. या सुविधेमुळे निवडलेल्या संपर्काला तुमचे स्टेटस लगेच दिसेल आणि संदेश पोहोचवणे आणखी सोपे होणार आहे.

लगेच नोटिफिकेशन मिळेल

व्हॉट्सअॅपने स्टेटसमध्ये "कॉन्टॅक्ट मेंशन" फीचर उपलब्ध करून दिले आहे. यामुळे यूजर्स स्टेटस टाकताना विशिष्ट संपर्काचा उल्लेख करू शकतात. ज्यांचा उल्लेख केला जाईल त्यांना लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि ते लगेचच तुमचे स्टेटस पाहू शकतील.

फोनबुकमध्ये सेव्ह केलेल्या लोकांसाठी उपलब्ध

हे लक्षात घ्या की WhatsApp वरील "कॉन्टॅक्ट मेंशन" फीचर फेसबुकसारखे नाही. या सुविधेद्वारे तुम्ही फक्त तुमच्या फोनबुकमध्ये सेव्ह केलेल्या लोकांनाच स्टेटसमध्ये उल्लेख करू शकता, अनोळखी नंबरसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com