तरुणांनो, Internship सुरु करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

Job Recruitment : इंटर्नशिप म्हणजे तुम्हा ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहात त्या क्षेत्रातील कंपनीमध्ये कामाचा प्रत्यक्षरित्या अनुभव घेणे. आपल्या करिअरला आकार देण्यासाठी इंटर्नशिपचा उपयोग होतो. या इंटर्नशिपमध्ये आपण चांगल्या प्रकारे काम केले तर कंपनी आपल्या कायमस्वरुपी नोकरीसाठी ठेवते.
Internship
InternshipSaam tv
Published On

How to get a good Internship :

कॉलेज झाल्यानंतर किंवा कॉलेज सुरु असताना आपल्याला प्लेसमेंट मिळते. अशावेळी आपण नोकरी करण्याच्या उत्साहात अधिक असतो. शिकता शिकता नोकरी करणे हा इंटर्नशिपचा महत्त्वाचा भाग समजला जातो.

इंटर्नशिप म्हणजे तुम्हा ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहात त्या क्षेत्रातील कंपनीमध्ये कामाचा प्रत्यक्षरित्या अनुभव घेणे. आपल्या करिअरला आकार देण्यासाठी इंटर्नशिपचा उपयोग होतो. या इंटर्नशिपमध्ये आपण चांगल्या प्रकारे काम केले तर कंपनी आपल्या कायमस्वरुपी नोकरीसाठी ठेवते.

इंटर्नशिपमुळे त्या कंपनीतील (Company) कामाची पद्धत कशी आहे, याचे प्राथमिक ज्ञान उमेदवारांना मिळते, तसेच कॉर्पोरेट जगात कोणत्या पद्धतीने वावरायचे हे देखील कळते.

Internship
Paytm कडून पुन्हा कर्मचारी कपात! १००० हून अधिक लोकांना दाखवला थेट घरचा रस्ता

इंटर्नशिपसाठी कोणती कंपनी निवडायची असा प्रश्न उमेदवारांपुढे असतो. नावाजलेली कंपनी की, नुकतीच मार्केटमध्ये नाव कमावत असणारी कंपनी या पद्धतीने योग्य तो पर्याय निवडतात. परंतु, नावाजलेल्या कंपनीत काम केल्याने उमेदवारांना भविष्यात फायदा (Benefits) होऊ शकतो. छोट्या कंपनीत उमेदवारांची संख्या कमी असतात.

छोट्या कंपनीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विभागामध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे संपूर्ण कामाची माहिती मिळते. इंटर्नशिप ही फ्रीमध्ये केली जाते. काही कंपन्या यासाठी उमेदवाराला काम बघून पैसे (Money) देतात तर काही फ्रीमध्ये काम करुन घेतात. यामध्ये कंपनीच्या कामाचा अनुभव हाच तुमचा पगार असतो. परंतु, हा अनुभव पुढील काळात नोकरीसाठी अधिक उपयोगी ठरतो.

Internship
IOCL Recruitement 2023: इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती! १८२० रिक्त पदे, कसा कराल अर्ज?

इंटर्नशिपमुळे आपल्याला कामाची पद्धत कळते. तसेच यामुळे चारचौघांमध्ये कसे बोलायते, वागायचे याचे शिक्षण आपल्याला आपोआप मिळते. तसेच आपला आत्मविश्वास वाढतो. इंटर्नशिपमुळे आपल्याला आपल्या स्वत:च्या गुणवत्तेचे मूल्यमापन करता येते. कोणत्या क्षेत्रात आपण कमी पडत आहोत हे इंटर्नशिपद्वारे कळते.

काही कंपन्या या बाहेरगावच्या इंटर्नशिप करण्याची संधी देतात. परंतु, यासाठी विद्यार्थ्यांनी त्यासाठी लागणारा खर्च, प्रवास याचा विचार करावा. कोणत्या इंटर्नशिप करायची, यासाठी या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करा. तसेच कोणत्या कंपनीत इंटर्नशिप करायची याता निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com