Yoga Tips
Yoga Tips Saam Tv

Yoga Tips : योग केल्यानंतर या गोष्टी चुकूनही करू नका, यामुळे शारीरिक समस्या उद्भवतात

Yoga Rules : निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी योग खूप फायदेशीर आहे. योगाद्वारे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होऊ शकतात. योग हा रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतो, आणि सर्दी-खोकला इत्यादी आजारांपासून आराम देतो, तसेच उपचार करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
Published on

After Yogasana :

निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी योग खूप फायदेशीर आहे. योगाद्वारे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होऊ शकतात. योग हा रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतो, आणि सर्दी-खोकला इत्यादी आजारांपासून (Disease) आराम देतो, तसेच उपचार करण्यासाठी देखील प्रभावी आहे.

नियमित योगाभ्यासामुळे शरीर अनेक आजारांपासून सुरक्षित राहते. योगा केल्याने वजनही नियंत्रित राहते. केस गळण्यापासून ते शारीरिक इतर समस्यांपर्यंत प्रतिबंध करते. सध्याच्या लोकांच्या खराब जीवनशैलीमुळे (Lifestyle) लहानग्यांना लगेच या गोष्टींचा त्रास होतो. तसेच शारीरिक इतर समस्यांवरही विविध प्रकारचे योगाचा चांगला प्रभाव पडतो. परंतु योगासनाच्या चुकीच्या अभ्यासामुळे किंवा योगापूर्वी आणि नंतरच्या क्रिंयांच्या योग्य माहिती नसल्यामुळे योगाचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.

बरेच लोक योगा करतात पण तरीही आजारी पडतात. योग्य प्रकारे योगा न करणे हे एक कारण आहे. योगाभ्यास करण्यापूर्वी आणि नंतर केलेल्या चुका शरीरासाठी हानिकारक असू शकतात हे लोकांना कळायला हवे. योगानंतर लगेच काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेऊया, जेणेकरून योगाचे शरीरावर फायदेशीर (Benefits) परिणाम होतात.

Yoga Tips
Yoga For Fitness : दररोज नियमित फक्त 15 मिनिटे वेळ काढा, ही योगासने करा आणि निरोगी राहा

योगासन नंतर लगेच या गोष्टी करू नका

योगा केल्यानंतर पाणी पिऊ नये

योगाभ्यास केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. योगानंतर पाणी प्यायल्याने घशात कफ येण्याचा त्रास होतो. अशा स्थितीत योगासने केल्यानंतर काही वेळ थांबा, किंवा थोड्यावेळाने पाणी प्यावे.

योगा केल्यानंतर लगेच स्नान करू नये

योगासने केल्याने भरपूर ऊर्जा वाया जाते आणि शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे योगाभ्यास केल्यानंतर लगेच आंघोळ करू नये, यामुळे सर्दी-खोकला सारखे आजार होऊ शकतात.

Yoga Tips
Yoga Tips : पोटाच्या चरबीसह अनेक आजारांपासून मुक्ती मिळवा, दररोज नियमित ही योगासने करा

योगा केल्यानंतर लगेच काही खाऊ नये

योगासने केल्यानंतर लगेच अन्न खाऊ नये. योगासन केल्यानंतर किमान अर्ध्या तासानेच अन्न खावे. हे लक्षात ठेवा की जड आहार घेण्याऐवजी फक्त हलका आहार घ्या. योगासने करण्यापूर्वीही खाणे चुकिचे ठरू शकते. असे केल्याने अपचनाचा त्रास होऊ शकतो.

आजारपणात योगा करू नये

नियमितपणे योगाभ्यास करा पण कधी आजारी पडलात तर योग करू नका. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. आजारपणात शरीर अशक्त आणि थकलेले राहते. योगासने करताना शरीरातील ऊर्जा वापरली जाते. अशा स्थितीत योगासने करू नयेत. वैद्यकीय सल्ल्यानंतर परवानगी घेऊन तुम्ही योगासन करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com