हसताना किंवा बोलाताना अवघडपणा जाणवतो तो आपल्या दातांमुळे. तोंड उघडताच पिवळे आणि घाणेरडे दात दिसले की आपल्याला लाज वाटू लागते. दात साफ करण्यासाठी आपण अनेक महागड्या टूथपेस्टचा वापर करतो परंतु तरीही दातांचा पिवळेपणा काही जात नाही.
दातांवर साचलेली घाण आणि पिवळेपणा अर्थात प्लेक आणि टार्टर हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ लागते. दातांना किड लागणे, दात दुखणे, हिरड्या दुखणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्याही दातांवर पिवळा थर जमला असेल तर आयुर्वेदातील या पदार्थांचा वापर करुन पाहा. दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होईल.
1. तुळशीची पाने आणि सुकलेली संत्र्याची साल
तुळशीच्या पानाची आणि सुकलेली संत्र्याच्या (Orange) सालीची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट दातांवर २० मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने दात (Teeth) स्वच्छ करा. असे केल्याने दातांवरील पिवळा प्लेक निघून जाण्यास मदत होईल.
2. बेकिंग सोडा आणि पाणी
२ चमचे बेकिंग सोड्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ५ मिनिट दातांवर राहू द्या. त्यानंतर तोंड स्वच्छ धुवा. रात्री झोपण्यापूर्वी नियमित केल्याने दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होईल.
3. मीठ आणि लिंबाचा रस
चिमुटभर मीठात लिंबाचा रस घालून त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टने दात स्वच्छ करा. ब्रश करताना फक्त हिरड्यांची काळजी (Care) घ्या. असे रोज केल्याने दातांवरील पिवळेपणा दूर होईल.
4. ऍपल सायडर व्हिनेगर आणि गरम पाणी
ग्लासभर कोमट पाण्यात दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. या पाण्याने गुळणा करा. असे आठवड्यातून एकदा केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.