Teeth Whitening Remedy At Home : झोपेतून उठल्यानंतर आपण सगळेच जण ब्रश करतो. दात साफ करण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचे टूथ पेस्ट देखील वापरतो. डॉक्टरांच्या मते किमान दिवसातून दोन वेळी तरी ब्रश करायला हवा. ज्यामुळे दातात अडकलेले अन्नपदार्थ बाहेर निघण्यास मदत होते.
परंतु, कितीही काही केले तरी दातांचा पिवळेपणा काही जात नाही. हसताना किंवा खाताना दाताचे हे पिवळेपण सर्वांसमोरच दिसून येते. अशावेळी कितीही डॉक्टरांचा सल्ला घेतला तरीही दात पिवळेच राहाता. पण आम्ही तुम्हाला महागड्या खर्चापेक्षा काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुमच्या दातांचे पिवळेपण कमी होऊन ते पांढरे शुभ्र होतील. मग हे उपाय करुन पाहा.
1. दात कसे चमकवाल ?
दात (Teeth) आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी (Health) केवळ ते नियमितपणे घासणे गरजेचे नाही. तर दातांची काळजी घेणे देखील अधिक महत्त्वाचे आहे. दातांची निगा राखण्यासाठी आपल्याला आहारात कॅल्शियम युक्त आहार घेतला पाहिजे. ज्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होईल. तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही बियांचे सेवन करु शकतो. दातांची चमक व हिरड्यांची काळजी (Care) घेण्यासाठी आपण तिळाचे सेवन करु शकतो. भाजलेले तीळ सकाळी लवकर उठून चावून खाल्ल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. त्यानंतर टूथपेस्ट किंवा सॉफ्ट टूथ ब्रशने पुन्हा दात घासल्यास फायदा होईल.
2. तीळाचा दातांसाठी कसा फायदा होतो ?
तीळ दातांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन (Vitamins) ई आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया तीळ चघळल्याने काय होते.
3. दात मजबूत राहतात :
तीळातील कॅल्शियम दात मजबूत आणि स्थिर होण्यास मदत करते. यामुळे दात अधिक मजबूत होतात व दातदुखीपासून बचाव करता येतो.
4. हिरड्यांचे आरोग्य:
तीळातील व्हिटॅमिन ई हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. यात असणारे अँटिऑक्सिडंट्स हिरड्यांच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात तसेच त्या मजबूत आणि निरोगी ठेवतात.
5. श्वासाची दुर्गंधी:
तीळातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करते. त्याचे सेवन केल्यास तोंडातील जीवाणूजन्य विकार कमी होतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.