High Cholesterol : हृदयाचे आरोग्य जपा अन् वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा! हे ५ सोपे उपाय करतील मदत

Bad cholesterol Side Effects सतत वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा आपल्या हृदयावर गंभीर परिणाम होतो.
High Cholesterol
High CholesterolSaam Tv
Published On

World Heart Day :

२९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिवस साजरा केला जाईल. आपण हृदयाचे आरोग्य जपतो परंतु, दुर्लक्ष केले जाते ते वाढत्या कोलेस्ट्रॉलकडे. सतत वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा आपल्या हृदयावर गंभीर परिणाम होतो.

वर्षभरात ४.४ दक्षलक्ष लोक हृदयाचा आजारामुळे त्रस्त आहेत त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण कोलेस्ट्रॉल. उच्‍च कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांमुळे हृदयविषयक आजार व कार्डियोव्‍हॅस्‍कुलर समस्‍यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात कसे ठेवायचे

High Cholesterol
Worst Foods for Heart : हृदयाला निरोगी ठेवायचे आहे? आहारातल्या या पदार्थांना लगेच करा बाय बाय

1. १० पैकी ६ भारतीयांना उच्‍च एलडीएल कोलेस्‍ट्रॉल आहे?

कोलेस्‍ट्रॉल (cholesterol) आणि व्‍यक्‍तीच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍यावर होणारे त्‍याचे परिणाम माहित असणे आरोग्‍यदायी व दीर्घकालीन जीवनासाठी महत्त्वाचे आहे. व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तामध्‍ये असलेला फॅटी घटक कोलेस्‍ट्रॉल सेल मेम्‍ब्रेन्‍स (पेशी आवरण) तयार करणे आणि हार्मोन्‍सची निर्मिती अशा शरीरातील विविध कार्यांसाठी आवश्‍यक आहे.

पण कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांमध्‍ये असंतुलन निर्माण झाले, विशेषत: 'बॅड कोलेस्‍ट्रॉल' म्‍हणून संबोधले जाणारे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्‍ट्रॉल (एलडीएल-सी) मध्‍ये वाढ होते तेव्‍हा हृदयविषयक आजारांचा धोका वाढतो. दुसरीकडे, 'गुड कोलेस्‍ट्रॉल' म्‍हणून ओळखले जाणारे हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्‍ट्रॉल (एचडीएल-सी) रक्‍तप्रवाहामधील अतिरिक्‍त कोलेस्‍ट्रॉल कमी करण्‍यामध्‍ये मदत करण्याची भूमिका साकारते, ज्‍यामुळे हृदयाच्या (heart) आजाराचा धोका कमी होतो. म्‍हणून, व्‍यक्‍तीच्‍या हृदयाच्‍या आरोग्‍याचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी एलडीएल-सीच्‍या पातळ्यांबाबत माहित असणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. झाकिया खान म्‍हणाल्‍या, ''भारतात हृदयविषयक आजारांचे प्रमाण वाढत आहे आणि पाश्चिमात्‍य देशातील व्‍यक्‍तींच्‍या तुलनेत दहा वर्ष अगोदर भारतीयांना हृदयविषयक आजार होत आहेत. विशेषत: सीव्‍हीडी हिस्‍ट्री असलेल्‍या रूग्‍णांना कोलेस्‍ट्रॉल पातळी व हृदयाचे आरोग्‍य यामधील महत्त्वाच्‍या संबंधाबाबत सांगते. एलडीएल-सी च्‍या पातळ्यांमध्‍ये वाढ झाल्‍यास हृदयविषयक आजार (Disease) होण्‍याचा धोका वाढू शकतो.

रक्‍तवाहिन्‍या अरूंद होण्यासह कोलेस्‍ट्रॉल ब्‍लॉकेज होऊ शकतो आणि हृदयाचा झटका व स्‍ट्रोक्‍सचा धोका वाढू शकतो. म्‍हणून नियमित तपासणी करत एलडीएल-सी पातळ्यांबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्‍हाला मधुमेह, उच्‍च रक्‍तदाब किंवा पूर्वी अकाली कोरोनरी आर्टरी डीसीज (सीएडी)ची हिस्‍ट्री असल्‍यास धोका अनेकपटीने वाढतो.''

High Cholesterol
Weight Loss Food : आठवड्याभरात वजन होईल झटक्यात कमी, डाएटमध्ये समावेश करा स्वयंपाकघरातील हे पदार्थ

2. हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी पालन करावयाचे ५ उपाय पुढीलप्रमाणे:-

1.नियमित तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन

कोलेस्‍ट्रॉलला नियंत्रण ठेवण्यासाठी त्‍याबाबत माहिती असणे आवश्‍यक आहे. कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍यासाठी आणि हृदयाचे आरोग्‍य उत्तम असल्‍याची खात्री करण्‍यासाठी आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांकडे (डॉक्‍टर) नियमितपणे तपासणी करा. रक्‍तचाचण्‍यांमधून कोलेस्‍ट्रॉलबाबत माहिती मिळते, ज्‍यामुळे तुम्‍ही व तुमचे डॉक्‍टर तुमचा आहार, व्‍यायाम नित्‍यक्रम व आवश्‍यक असल्‍यास संभाव्‍य औषधोपचार याबाबत योग्‍य निर्णय घेऊ शकतील.

High Cholesterol
White Hair Problem : खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळून लावा, पांढरे केस होतील काळेभोर

2.व्‍यायाम करा आणि सक्रिय राहा

नियमित व्‍यायाम हृदयाचे आरोग्‍य व कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापनासाठी महत्त्वाचा आहे. कोलेस्‍ट्रॉल पातळ्या सुधारण्‍यासाठी जलद चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा सायकल चालवणे अशा मध्‍यम स्‍वरूपाचे व्‍यायाम करा. व्‍यायाम केल्‍याने एचडीएल कोलेस्‍ट्रॉलमध्‍ये वाढ होते, तसेच वजनावर नियंत्रण राहते, लठ्ठपणाशी संबंधित कोलेस्‍ट्रॉलचा धोका कमी होतो. कोलेस्‍ट्रॉलवरील देखरेखीमध्‍ये अधिक सुधारणा करण्‍यासाठी नियमितपणे व्‍यायाम करा.

3. आरोग्‍यदायी आहार

आहाराचा तुमच्‍या कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर परिणाम होतो. जेवणामध्‍ये हृदयाच्‍या आरोग्‍याला अनुकूल खाद्यपदार्थांचा समावेश करा, ज्‍यामध्‍ये फायबर व पौष्टिक घटक संपन्‍न प्रमाणात असतील, ज्‍यामुळे एलडीएल ('बॅड') कोलेस्‍ट्रॉल कमी होईल. आरोग्‍यदायी आहारासह योग्‍य वैद्यकीय सल्‍ला आरोग्‍यदायी हृदयासाठी आवश्‍यक आहे.

High Cholesterol
Smart and Intelligent Women : इंटेलिजंट महिलांमध्ये असतात खास गुण, कसे ओळखाल?

4. वजन राखा

अधिक वजन, विशेषत: कमरेभोवती असलेल्‍या अधिक चरबीमुळे एलडीएल कोलेस्‍ट्रॉलमध्‍ये वाढ होऊ शकते. संतुलित आहाराचे सेवन व नियमित व्‍यायाम करत वजन कमी केल्‍याने कोलेस्‍ट्रॉल प्रोफाइलमध्‍ये वाढ होते. वजन संतुलित असल्‍याने हृदयविषयक आजाराचा धोका कमी होतो आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहते.

5.अनारोग्‍यकारक सवयी टाळा

धूम्रपान व अधिक प्रमाणात मद्यपानाचा हृदयाचे आरोग्‍य व कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर घातक परिणाम होऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्‍तवाहिन्‍यांचे नुकसान होते, ज्‍यामुळे कोलेस्‍ट्रॉल वाढते. धूम्रपान सोडणे आणि मद्यपानाचे प्रमाण कमी अशा बाबींसह हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍याला प्राधान्‍य द्या.

High Cholesterol
Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला अद्भूत योग! या राशी होतील मालामाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com