World Environment Day : पर्यावरणाची हानी ठरतेय जीवघेणी! भविष्यातील धोका ओळखून, अशी घ्याल काळजी

Environment Day : निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची काळाची गरज आहे.
World Environment Day
World Environment Day Saam Tv
Published On

Side Effects Of Pollutions : प्रदूषण आणि हवामान बदलामुळे मोठ्या संख्येने लोकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याची काळाची गरज आहे.

हवामान (Weather) आणि संबंधीत पर्यावरणीय आपत्तींमुळे जगाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, टायफून आणि चक्रीवादळे मोठ्या प्रमाणावर नैसर्गीक विनाश घडवून आणतात आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो.

World Environment Day
World Environment Day 2023 : 'वसुधैव कुटुम्बकम्‌'... जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास

उच्च तापमानामुळे ओझोनचे प्रमाण वाढते ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवी फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते तसेच दम्याचे रुग्ण आणि फुफ्फुसाचे आजार (Disease) असलेल्यांना गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

पर्यावरणीय प्रदूषक आणि औद्योगिक कचरा यामुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), ब्राँकायटिस, हृदयरोग (Heart attack) (अनियमित हृदयाचे ठोके, हृदय अपयश), नैराश्य, स्ट्रोक, खवखव, खोकला आणि दम लागणे यासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात.

डॉ शाहिद पटेल, पल्मोनोलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणतात की, गेल्या कित्येक वर्षांपासून एखाद्या ठराविक ठिकाणी असलेले ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच क्लायमेट चेंज - हवामान बदल.

World Environment Day
World Environment Day 2023 : घरात 'ही' 5 रोपं लावा आणि प्रदूषणाला दूर करा

मानव हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक घटक आहे. सहाजिकच निसर्गचक्र बिघडले तर मानवी आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. वायू, जल, ध्वनी, प्रकाश, असे विविध प्रकारचे प्रदूषण, रसायनांचा खतांचा अतिवापर, ठिकठिकाणी सुरु असलेली बांधकामे, अनियंत्रित वृक्षतोड, शेतकऱ्याकडून केला जाणारा जंतुनाशकाचा वापर आणि पर्यावरणीय बदल हे सतत आपल्या आयुष्यावर परिणाम करतात.

1. प्रदूषणांचा आरोग्यावर कसा परिणाम होतो ?

प्रत्येकाला जगण्यासाठी श्वास घ्यावा लागतो. प्रदूषित वातावरणामध्ये श्वास घेतल्यास ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे अनेकांना श्वसानाच्या अनेक विकारांचा त्रास होतो. हवेमध्ये अस्तित्वात असलेले कार्बन मोनोऑक्साइड एखाद्या विषाप्रमाणे असते. आसपास जमा झालेली घाण आणि कचऱ्यामुळे वातावरण प्रदूषित होते. प्लास्टिक अत्यंत हानिकारक असून यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. आजूबाजूचे वातावरण दूषित असेल तर अनेक आजार जडतात. गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांवरही याचा परिणाम होतो.

World Environment Day
Air Pollution: कोरोनाहून भयंकर! मुंबईत हवा प्रदूषणामुळे 14 हजार नागरिकांचा मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, 2030 ते 2050 दरम्यान, हवामान बदलामुळे कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि वाढत्या उष्णतेच्या दरवर्षी अंदाजे 2,50,000 अतिरिक्त मृत्यू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

2. प्रदूषणाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो ?

  • दिवसेंदिवस बदलणारे हवामान हे मानवी फुफ्फुसांवर दुष्परिणाम करतात, ज्यामुळे अनेकदा श्वसनासंबंधीत समस्या उद्भवतात.

  • वायुप्रदूषण, उष्णतेची लाट, हवामानातील सततचे चढ-उतार अशा काही कारणांमुळे फुफ्फुसांवर दुष्परिणाम होतात.

  • ज्यामुळे दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), फुफ्फुसाचा कर्करोग आणि फुफ्फुसांचा संसर्ग अशा तक्रारी दिसून येतात.

World Environment Day
Shivali Parab : शिवालीला पाहून म्हणाल परिकथेच्या पऱ्या, होऊनी खऱ्या...
  • बदलत्या हवामानामुळे वातावरणात परागकणांचे आणि ऍलर्जीचे प्रमाण वाढत चालले आहे, ज्यामुळे ऍलर्जी आणि दम्याचा अटॅक येतो.

  • खराब हवेच्या गुणवत्तेसह या समस्या अधिक तीव्र होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर थेट परिणाम होतो.

  • म्हणून ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी, चांगल्या प्रतीच्या ऊर्जा उत्पादनात गुंतवणूक करण्यासाठी आणि औद्योगिक आणि वाहतूक प्रदूषणावर कठोर नियम लागू करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com