World Environment Day 2023 : 'वसुधैव कुटुम्बकम्‌'... जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास

World Environment Day celebrated : जीवनाच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरण सुरक्षित व संरक्षित ठेवणे आज काळाची गरज आहे.
World Environment Day 2023
World Environment Day 2023Saam Tv
Published On

When was the first World Environment Day celebrated : वसुधैव कुटुम्बकम्‌ या कल्पनेचा पहिला उल्लेख महा उपनिषदात सापडतो. वसुधा अर्थात पृथ्वी, इव म्हणजे ही, कुटुम्बकम्‌ अर्थात कुटुंब. याचा अर्थ असा की, संपूर्ण पृथ्वी ही आपले कुटुंब आहे व तिची काळजी घेणे आपल्या प्रत्येकांचे कर्तव्य आहे.

जीवनाच्या सुरक्षिततेसाठी पर्यावरण (Environment) सुरक्षित व संरक्षित ठेवणे आज काळाची गरज आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करताना आपण पर्यावरणाचा देखील विकास करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वी व पर्यावरणासाठी घातक असणाऱ्या गोष्टींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. निसर्गाशिवाय जीवन शक्य नाही. पण माणूस या निसर्गाची (Nature) हानी करत आहे. पर्यावरण सतत प्रदूषित होत आहे, ज्याचा परिणाम जनजीवनावर होत आहे तसेच नैसर्गिक आपत्तीचे कारण बनत आहे.

World Environment Day 2023
World Environment Day 2023 : घरात 'ही' 5 रोपं लावा आणि प्रदूषणाला दूर करा

आनंदी व निरोगी जीवनासाठी निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक आहे. दरवर्षी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. लोकांना पर्यावरणाविषयी जागरूक केले जाते आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. चला जाणून घेऊया पर्यावरण दिन कधी आहे, हा दिवस कसा आणि का साजरा केला गेला.

1. कधी साजरा केला जातो ?

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जून महिन्यात साजरा केला जातो. भारतासह जगभरात ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या निमित्ताने सर्व देश वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरण जागृती कार्यक्रम आयोजित करतात.

World Environment Day 2023
Kirthi Shetty : झुमका बरेली वाला,कानों में ऐसा डाला...

2. पर्यावरण दिनाचा इतिहास

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात ही 1972 पासून झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून 1972 रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा केला, तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा (Celebrate) केला जातो.

3. पहिला पर्यावरण दिवस या देशात साजरा करण्यात आला

संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरवले होते. परंतु, पहिला पर्यावरण दिन हा स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे साजरा करण्यात आला. 1972 मध्ये स्टॉकहोम येथे पहिली पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये 119 देश सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com