Air Pollution: कोरोनाहून भयंकर! मुंबईत हवा प्रदूषणामुळे 14 हजार नागरिकांचा मृत्यू

हवा प्रदूषणामुळे केवळ जीवितहानी नाही तर आर्थिक नुकसानही मोठं झालं आहे.
Air Pollution
Air PollutionSaam Tv
Published On

मुंबई : मुंबईतील प्रदूषित हवा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईतील हवा विषारी बनत चालल्याने मुंबईकरांचा 'श्वास कोंडत' आहे. असं म्हणायचं कारण गेल्या दोन वर्षात मुंबईत वायू प्रदूषणामुळे जवळपास 14 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एवढ्या कमी वेळेत एवढ्या मृत्यूंमुळे हवा प्रदूषण कोरोनाहून भयंकर वाटू लागलंय.

हवा प्रदूषणामुळे केवळ जीवितहानी नाही तर आर्थिक नुकसानही मोठं झालं आहे. शहराच्या अर्थव्यवस्थेला सुमारे 2.1 अब्ज डॉलरचा फटका बसल्याची धक्कादायक माहिती ग्रीनपीस या आंतरराष्ट्रीय पर्यावरणविषयक संस्थेच्या अहवालातून पुढे आली आहे.जगभरात पर्यावरणाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास ग्रीनपीसने केला आहे. (Mumbai News)

Air Pollution
Aryan Khan: 'लेकापेक्षा बाप परवडला...', आर्यनचा भलताच माज म्हणत नेटकरी संतापले

प्रदूषणामुळे देशभरात दरवर्षी लाखो नागरिकांचा मृत्यू होतो. त्यापैकी सुमारे 18 टक्के मृत्यू हे केवळ वायुप्रदूषणामुळे होतात. वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामामुळे त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होतो.

Air Pollution
Jejuri : येळकोट येळकोट जय मल्हार... जेजुरी गडावर भंडाऱ्याची मुक्त उधळण; Somvati Amavasya निमित्त लाखाे भाविक दाखल

प्रदूषण आणि पर्यावरण बदलामुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम होतो.प्रदूषण वाढल्यास ग्राहकांची संख्या पाच टक्क्याने घटते, असेही या सर्वेक्षणात नमूद केले आहे.देशात वायुप्रदूषणामुळे कामगार आणि मजुरांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे जीडीपीचे तीन टक्के नुकसान होते, म्हणजे दरवर्षी अर्थव्यवस्थेचे सुमारे 95 अब्ज डॉलरचे नुकसान होते, असंही सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com