World Asthma Day: वायू प्रदूषणाचा फुफ्फुसांवर कसा परिणाम होतो? थॅलेसेमिया रुग्णांसाठी महत्वाची माहिती

Health Risk : वाढतं वायू प्रदूषण थॅलेसेमिया रुग्णांच्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर गंभीर परिणाम करत आहे. त्यामुळे या रुग्णांनी सावध राहणे महत्वाचे आहे.
thalassemia and air pollution
thalassemia and air pollutiongoogle
Published On

वाढत्या शहरी वायू प्रदूषणामुळे थॅलेसेमिया रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. थॅलेसेमियाबद्दल सहसा रक्त तपासणी आणि ट्रान्सफ्युजनच्या दृष्टीने विचार केला जातो. मात्र आता “आपण श्वासात घेतो ती हवा” हा देखील महत्त्वाचा घटक ठरत असल्याचे निरीक्षण समोर येत आहे.

बालरोग रक्तविज्ञान तज्ज्ञ म्हणून, हिमोग्लोबिन पातळी तपासणे, आयर्न केलेशन व्यवस्थापन करणे आणि दररोज लढणाऱ्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे हा दैनंदिन अनुभव आहे. मात्र अलीकडील काळात वायू प्रदूषणामुळे या मुलांच्या आरोग्यात होणारे बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

thalassemia and air pollution
Petrol Diesel Price Today: निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, वाचा तुमच्या शहरात ताजे रेट्स

थॅलेसेमिया मेजर असलेल्या मुलांसाठी आयुष्य हे एक नाजूक समतोल साधण्याचे आव्हान असते. दीर्घकालीन अॅनिमिया आणि शरीरातील जास्तीचं लोखंड (iron overload) यामुळे त्यांचे शरीर आधीच ताणाखाली असते. अशा परिस्थितीत वायू प्रदूषण हा केवळ किरकोळ त्रास नसून त्यांच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा गंभीर घटक ठरतो.

thalassemia and air pollution
Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

हृदय आणि फुफ्फुसांवर ‘दुहेरी ताण’

थॅलेसेमिया रुग्णांमध्ये पर्यावरणीय विषारी घटकांचा परिणाम अधिक तीव्रतेने दिसून येतो. सूक्ष्म प्रदूषक कण (fine particulate matter) श्वासावाटे शरीरात जाऊन फुफ्फुसांमध्ये खोलवर पोहोचतात आणि रक्तप्रवाहात मिसळून दाह (inflammation) निर्माण करतात.

ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस:

थॅलेसेमिया हा मुळातच जादा लोखंडामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवणारा आजार आहे. वायू प्रदूषण ही प्रक्रिया अधिक वेगवान करून पेशींना नुकसान पोहोचवते.

श्वसन क्षमता (Respiratory Reserve):

अनेक रुग्णांमध्ये छाती आणि फुफ्फुसांमध्ये आयर्न साठल्यामुळे श्वसनक्षमता आधीच मर्यादित असते. प्रदूषित हवा श्वसनमार्ग अधिक संवेदनशील बनवून ही क्षमता आणखी कमी करते.

हृदयावर परिणाम

आयर्न ओव्हरलोडचा सर्वाधिक परिणाम हृदयावर होतो. वायू प्रदूषणामुळे रक्तदाब वाढणे आणि रक्त घट्ट होणे यामुळे आधीच ताणाखाली असलेल्या हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. डॉ. लिझा बुलसारा, बालरोग रक्तविज्ञान तज्ज्ञ व BMT फिजिशियन, Ruby Hall Clinic, म्हणाल्या,“जेव्हा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ‘Severe’ पातळीवर जातो, तेव्हा रुग्णांमध्ये स्पष्ट बदल दिसून येतात. नेहमी स्थिर असलेली मुले अचानक अधिक थकलेली दिसतात आणि ट्रान्सफ्युजन दरम्यानचा कालावधी कमी होतो. वैद्यकीय उपचार व्यवस्थित सुरू असतानाही वातावरणाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.”

यावर उपाय काय?

थॅलेसेमियाला केवळ रक्ताशी संबंधित आजार म्हणून न पाहता पर्यावरणाशी संबंधित आरोग्य समस्या म्हणूनही गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

क्लिनिकल सतर्कता: तपासणीत पर्यावरणीय इतिहासाचा समावेश करणे, तसेच N95 मास्क आणि दर्जेदार एअर फिल्ट्रेशनचा सल्ला देणे.

पोषण सहाय्य: अँटिऑक्सिडंट्सयुक्त आहार वाढवून प्रदूषणामुळे होणारा ताण काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

धोरणात्मक पातळीवरील प्रयत्न: स्वच्छ हवा धोरणांमध्ये थॅलेसेमिया रुग्णांसारख्या संवेदनशील गटांचा समावेश करणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांच्या मते, थॅलेसेमिया रुग्णांसाठी केवळ उपचार पुरेसे नाहीत, तर स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. रुग्णांना केवळ जिवंत ठेवणे नव्हे, तर त्यांना निरोगी आणि सुरक्षित वातावरणात जीवन जगता यावे हेही तितकेच आवश्यक आहे.

thalassemia and air pollution
Cheap Mango Varieties: हापूस परवडत नाहीये? मग हे ६ आंबे नक्की ट्राय करा; चव बघून म्हणाल, आधी का नाही सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com