Sakshi Sunil Jadhav
उन्हाळा आला की सगळ्यांच्या जेवणाच्या ताटात आंब्याच्या फोडी असतात. पण अनेकांना आंब्याचे प्रसिद्ध प्रकार माहित नसतात.
पुढील माहितीत आपण आंब्यांचे प्रकार आणि त्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. बरं हे आंबे सगळ्यात स्वस्त मिळतात.
केसर आंबा हा गुजरातमध्ये केशरी रंगावरुन प्रसिद्ध आहे. याची . किंमत हापूसपेक्षा कमी असते.
उत्तर भारतात दशहरी आंबा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. हा आंबा लांबट, पातळ आणि रसाळ गराचा असतो.
वाराणसी परिसरात मिळणारा हा लंगडा आंबा एकदम सुंगधी असतो. पण याची चव आंबट-गोड अशी असते.
कर्नाटकचा हापूस म्हणजे हा बदामी आंबा आहे. याची किंमत कमी पण चव उत्तम असते.
थोडा आंबटसर, मोठ्या आकाराचा आणि रस, पल्पसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा हा आंबा आहे.
फायबर कमी, गोडवा जास्त आणि सगळ्यात सॉफ्ट टेक्चर असलेला हा आंबा आहे.
कारण की, याचं स्थानिक उत्पादन जास्त असतं आणि निर्यात कमी असल्यामुळे हे आंबे परवडणाऱ्या दरात विकले जातात.