Petrol-Diesel Price: खरंच पेट्रोल-डिझेल २५ ते २८ रुपयांनी महागणार? आज तुमच्या शहरातील दर किती? वाचा सविस्तर

Petrol-Diesel Price In Your City: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा बदल झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार असल्याचे बोलले जात आहे. आज तुमच्या शहरामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली की घसरण? हे जाणून घ्या....
Petrol-Diesel Rate Today
Petrol Diesel PriceSaam Tv
Published On

Summary -

  • पेट्रोल-डिझेल दर २५-२८ रुपयांनी वाढणार या बातम्या खोट्या ठरल्या

  • केंद्र सरकारने दरवाढीचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले

  • २४ एप्रिल रोजी देशभरात इंधन दर स्थिर

  • कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तरी दरात बदल नाही

  • मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये दर कायम

Petrol-Diesel Rate Today: ५ राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दरामध्ये २५ ते २८ रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली होती. पण केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत कोणताही विचार सुरू नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला. आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर समोर आले आहेत. २४ एप्रिल रोजी देशभरामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

कोटक इस्टिट्यूशनल इक्विटीजने दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर २५ ते २८ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रिफायनर्सवर आर्थिक दबाव वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार आहेत.

Petrol-Diesel Rate Today
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर बदलले; वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

पण भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले. मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत स्पष्टपणे सांगितले की, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव विचारधीन नाही.

नुकताच सेक्टर नोटमध्ये ब्रोकरेजने सांगितले की, इराण- अमेरिकेत सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती जास्त असल्याने आणि भारतीय रिफायनर्सना मोठे नुकसान होत असल्याने किरकोळ इंधन दरांवरील सध्याची स्थगिती टिकवणे जास्तच कठीण होत आहे.

Petrol-Diesel Rate Today
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

उत्पादन शुल्कातील कपात आणि इतर इंधनाच्या किमतींमधील मर्यादित बदल विचारात घेतल्यानंतरही वाढलेल्या कच्च्या तेलाच्या आयात खर्चामुळे रिफायनर्सना सध्या दरमहा अंदाजे २७० अब्ज रुपयांच्या अतिरिक्त भाराला सामोरे जावे लागत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी देखील भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच ठेवले आहेत त्यामुळे त्यांना फटका बसत असल्याचे दिसत आहे.

Petrol-Diesel Rate Today
Petrol Diesel Rate: राज्यात खासगी पंपांवर पेट्रोल-डिझेल महागलं; आता प्रति लिटर 'इतके' रुपये मोजावे लागणार

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर किती?

दिल्ली -

पेट्रोल - ९४.७७ रुपये

डिझेल - ८७.६८ रुपये

मुंबई -

पेट्रोल - १०३.५४ रुपये

डिझेल - ९०.०३ रुपये

कोलकाता -

पेट्रोल - १०५.४५ रुपये

डिझेल - ९२.०२ रुपये

चेन्नई -

पेट्रोल - १००.८० रुपये

डिझेल - ९२.३९ रुपये

बंगळुरू -

पेट्रोल -१०२.९२ रुपये

डिझेल - ९०.९९ रुपये

Petrol-Diesel Rate Today
Petrol-Diesel Price: निवडणुका संपताच पेट्रोल-डिझेल ३० रुपयांनी महागणार? केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com