Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर बदलले; वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव

Petrol Diesel Price in Maharashtra: रोज सकाळी तेल वितरक कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर करत असतात. आज महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर किती त जाणून घ्या.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त?

वाचा आजचे तुमच्या शहरातील दर

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होत आहे. सध्या दोन आठवड्यांसाठी युद्ध थांबवल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. मात्र, जेव्हा युद्ध सुरु होते तेव्हा या किंमती दिवसेंदिवस वाढत होत्या. कच्च्या तेलाच्या किंमतीं वाढल्यावर पेट्रोल डिझेलच्या किंमतीतदेखील बदल होतो. दरम्यान, सध्या कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर घसरले की वाढले ते जाणून घ्या.

Petrol Diesel Rate
Petrol Diesel Price : डिझेल तब्बल २५ रुपयांनी महागले, पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ, या कंपनीने अचानक वाढवल्या किंमती

कच्च्या तेलाच्या किंमती वाढत होत्या तरीही महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर फार काही परिणाम झाला नव्हता. आता कच्च्या तेलाच्या किंमती घसरत आहे तरीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, आज पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित बदल झाला आहे. काही ठिकाणी दर वाढलेत तर काही ठिकाणी कमी झाले आहेत. आजचे पेट्रोल डिझेलचे दर वाचा.

Petrol Diesel Rate
Petrol Diesel Price: मोठी बातमी! युद्धबंदीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price in Maharashtra)

मुंबईत पेट्रोलचे दर १०३.५० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलचे दर १०४.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.५७ रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोलचे दर १०४.३७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.८६ रुपये प्रति लिटर

सोलापुरात पेट्रोलचे दर १०५.०१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.५३ रुपये प्रति लिटर

साताऱ्यात पेट्रोल १०४.७६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.२९ रुपये प्रति लिटर

अमरावतीत पेट्रोलचे दर १०५.४७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.९८ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलचे दर १०५.३३ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.८२ रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate
Petrol-Diesel Price: टेन्शन वाढणार! पेट्रोल १८ रुपये, डिझेल ३५ रुपयांनी महागणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com