Crime : पेट्रोल पंपाच्या ना हरकत दाखल्यासाठी ५० हजारांची लाच मागितली; वनपाल, वनरक्षक महिलेला रंगेहाथ पकडले

kalyan forest department bribery case arrest news : नव्या पेट्रोल पंपासाठी ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात ५० हजारांची लाच मागणाऱ्या वनखात्याच्या दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. २५ हजारांची रक्कम स्वीकारताना हे दोघेही एसीबीच्या जाळ्यात अडकले.
kalyan Bribe Case
kalyan Bribe Casesaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, कल्याण | साम टीव्ही

कल्याण तालुक्यातील एका व्यक्तीला नवा पेट्रोप पंप सुरू करण्यासाठी वनखात्याकडून ना हरकत दाखला हवा होता. या दाखल्याच्या बदल्यात २५ हजारांची लाच स्वीकारताना वनपाल आणि वनरक्षक महिलेला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

कल्याण तालुक्यातील मामनोली येथे वनखात्याचे कार्यालय आहे. या कार्यालयात संबंधित वनपाल आणि वनरक्षक कार्यरत आहेत. कल्याण तालुक्यातील एका व्यक्तीला नवा पेट्रोल पंप सुरू करायचा होता. त्याला वनखात्याकडून ना हरकत दाखला हवा होता. त्याने त्यासाठी ठाणे जिल्हा वन अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यांच्या अर्जाची पडताळणी करून घटनास्थळी भेट देऊन त्याचा अहवाल सादर करण्यात येणार होता. त्यानंतर अर्जदारास ना हरकत दाखला दिला जाणार होता.

ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात वनपाल आणि वनरक्षकांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर २५ हजार रुपये घेण्याचे ठरले. तक्रारदाराला पैसे द्यायचे नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ठाणे विभागाने सापळा रचला.

kalyan Bribe Case
Crime: मैत्रिणीसोबत जाणाऱ्या मुलीचं अपहरण, शेतात ओढत नेऊन सामूहिक बलात्कार

मामनोली येथील वनखात्याच्या कार्यालयात तक्रारदारकडून २५ हजार रुपयांची लाच घेताना वनरक्षक महिलेला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेची रक्कम वनरक्षक महिलेने वनपालाच्या सांगण्यावरुन स्वीकारली. त्यामुळे वनपालालाही पोलिसांनी अटक केली.

kalyan Bribe Case
Crime: ७० वर्षांच्या आजीवर बलात्कार, तरुणाचं संतापजनक कृत्य; पाणी पिण्यासाठी मागितलं, घरात घुसला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com