

दिल्लीमध्ये ७० वर्षीय महिलेवर बलात्कार
आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसला
पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली
दिल्लीमध्ये ७० वर्षांच्या महिलेवर तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या रंजीत नगरमध्ये ही संतापजनक घटना घडली. आरोपीने आधी वृद्ध महिलेला मारहाण केली त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे दिल्ली हादरली. पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश सिंहने काही दिवसांपूर्वी महिलेच्या घरी जाऊन पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने गेला होता. त्यावेळी महिलेने त्याला मदत केली होती. ती घरामध्ये एकटी राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने कट रचला. शनिवारी त्याने वद्ध महिलेच्या घरात जबरदस्ती प्रवेश केला. आधी त्याने वृद्ध महिलेला मारहाण केली त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.
वृद्ध महिलेवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महिलेला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुरूवातीला हा हल्ला असल्याचा गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या दिवश या महिलेने मुलीसोबत पोलिस ठाण्यात धाव घेत हा फक्त हल्ला नाही तर माझ्यावर बलात्कार झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपी एका केटरिंग कंपनीत वेटर म्हणून काम करतो. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार केले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता आरोपी महिलेच्या घरी ये-जा करताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पांडव नगर येथून अटक केली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. महिला घरामध्ये एकटी राहत असल्याचा फायदा घेत आरोपीने हे कृत्य केले असल्याचे तपासतून उघड झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.